आपण सर्वज्ञ ; पण जाणकारांचा सल्ला घेत चला - पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 04:46 IST2018-10-26T04:46:09+5:302018-10-26T04:46:11+5:30

सत्ताधारी अचाट कल्पना मांडत असतात. परदेशातून कडबा आणायला माझी काहीच हरकत नाही

You are omniscient; But take advice from the experts - Pawar | आपण सर्वज्ञ ; पण जाणकारांचा सल्ला घेत चला - पवार

आपण सर्वज्ञ ; पण जाणकारांचा सल्ला घेत चला - पवार

औरंगाबाद : सत्ताधारी अचाट कल्पना मांडत असतात. परदेशातून कडबा आणायला माझी काहीच हरकत नाही; पण यात वेळ किती जाईल? असा सवाल उपस्थित करून ‘आपण सर्वज्ञ आहात; पण जाणकारांचा सल्ला जरा घेत चला ना,’ असा टोला राष्टÑवादीचे काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
चिखली येथे भारत बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहून शरद पवार हे औरंगाबादला आले होते.
आम्ही सत्तेत असताना
दुष्काळ की दुष्काळसदृश, अशा शब्दांमध्ये अडकून न पडता तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी
करीत होतो. निर्णय घ्यायला उशीर लावत नव्हतो आणि शब्दांचा
खेळ करीत बसण्याची ही वेळ
नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: You are omniscient; But take advice from the experts - Pawar