शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा उद्या निकाल, रिझल्ट कुठे व कसा पाहायचा? A टू Z माहिती
6
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
7
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
8
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
9
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
10
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
11
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
12
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
13
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
14
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
15
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
16
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
17
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
18
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
19
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
20
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
Daily Top 2Weekly Top 5

येलदरीत वृक्षलागवड

By admin | Updated: July 26, 2014 00:32 IST

प्रशांत मुळी, येलदरी येलदरी धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा, या हेतूने या भागात साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वन विभागाने ही वृक्षलागवड केली.

प्रशांत मुळी, येलदरीयेलदरी धरण परिसर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावा, या हेतूने या भागात साडेतीन हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाने ही वृक्षलागवड केली.जिल्ह्यातील येलदरी धरण पर्यटंकासाठी एक चांगले ठिकाण म्हणून नावारूपास आले आहे़ दरवर्षी येथे राज्यासह परराज्यांतून पर्यटक जलविद्युत केंद्रासह धरण पाहण्यासाठी येतात. पूर्वी याठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडी होती़ मात्र कालांतराने ही झाडे तोडल्याने हा परिसर उजाड झाला़ तत्कालीन जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांनी देखील या परिसरात झाडे लावण्यासाठी प्रयत्न केला होता मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही़ काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी एस़पी़ सिंह यांनी येलदरीचा दौरा केला होता़ त्यावेळी त्यांनी येथील या भागात झाडे लावण्यास वाव असल्याचे म्हटले होत़े़ त्यादृष्टीने येलदरी धरण परिसरात झाडे लावण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे ठेवण्यात येऊन सदरील जागा वनविभागाला झाडे लावून सुशोभीकरण करण्यासाठी ताब्यात देण्यात आली आहे़ जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता मोजमील, उपविभागीय अधिकारी खंदारे, शाखाअधिकारी ़सुधाकर जोशी, वनविभागाचे हनुमंत वाळके, उपवनसरंक्षक राठोड, वनपाल मो़ हश्मी, वनरक्षक गणेश घुगे, सुभाष पितळे, प्रकाश राठोड यांच्या प्रयत्नातून परिसर सुशोभित होत असल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे़सिंह यांनी केली होती पाहणीजिल्हाधिकारी एस.पी. सिंह यांनी काही महिन्यांपूर्वी येलदरी येथे भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी बोटींग करून परिसराची पाहणीही केली होती. त्याच वेळी त्यांनी झाडे लावण्याची सूचना केली होती.विविध जातींची झाडे आंबा, चिंच, आवळा, सिताफळ, सिसम, वड, पिंपळ, लिंब, अशोक आदीसंह विविध जातीचे झाडे याठिकाणी लावली आहेत़ यामुळे आगामी काळात हा परिसर सुशोभित होणार आहे. निधी मिळाल्यास पर्यटन विकास शक्य येलदरी धरणाच्या मधोमध मोठी टेकडी आहे. या टेकडीचा विकास केल्यास पर्यटनाला या ठिकाणी चालना मिळू शकते. परंतु पुरेसा निधी नसल्याने या टेकडीचा विकास झालेला नाही. शिवाय धरणामध्ये बोटींग व्यवसाय देखील वाढू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह यांनी जलाशयाच्या मधोमध असलेल्या टेकडीवरील प्रस्तावीत पर्यटनस्थळाला मान्यता द्यावी व पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे़