येलदरी धरणात पडून मजुराचा मृत्यू
By Admin | Updated: May 22, 2014 00:33 IST2014-05-22T00:29:02+5:302014-05-22T00:33:11+5:30
येलदरी : बांधकामासाठी आलेला मजूर आंघोळीसाठी येलदरी धरणात गेला असताना धरणात पडून त्याचा मृत्यू झाला़ ही घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली़

येलदरी धरणात पडून मजुराचा मृत्यू
येलदरी : बांधकामासाठी आलेला मजूर आंघोळीसाठी येलदरी धरणात गेला असताना धरणात पडून त्याचा मृत्यू झाला़ ही घटना २१ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली़ येलदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी मजूर म्हणून मिस्त्रीच्या हाताखाली आलेला शेख मोईन शेख मजीद (वय ३५, रा़ पठाण मोहल्ला, जिंतूर) हा बांधकामाचे काम आटोपून आंघोळीसाठी येलदरी धरणात गेला़ सदरील मजुरास पोहता येत नसल्यामुळे धरणाच्या काठाला आंघोळ करीत होता़ तो आंघोळ करीत असताना पाय घसरून पाण्यात पडला़ या घटनेची माहिती मिस्त्रीने जिंतूर पोलिस ठाण्यात दिली़ त्यानंतर येलदरी येथील काही मच्छीमार व पोहणार्या युवकांनी सदरील व्यक्तीचा शोध घेतला़ मात्र मजुराचा मृतदेह आढळून आला नाही़ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास तुकाराम गव्हाणे यांना शेख मोईन शेख मजीद या मजुराचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला़ त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली़ घटनास्थळी जिंतूर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल व्ही़ ए़ सूर्यवंशी, पोक़ाँ़ निळे आले़ त्यानंतर पंचनामा करण्यात आला़ या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)