येडियुरप्पांच्या सचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न
By | Updated: November 29, 2020 04:08 IST2020-11-29T04:08:05+5:302020-11-29T04:08:05+5:30
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव एन.आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात ...

येडियुरप्पांच्या सचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव एन.आर. संतोष यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आता प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संतोष यांनी शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. निवासस्थानी संतोष हे बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर कुटुंबियांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन संतोष यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संतोष यांनी हे पाऊल का उचलले, याचे कारण मात्र समजू शकले नाही.
........