सलग तिसऱ्या दिवशी यमदूत पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST2020-12-30T04:07:09+5:302020-12-30T04:07:09+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी कोरोना रुग्णांनी यमदूताला पराभूत केले. जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला ...

सलग तिसऱ्या दिवशी यमदूत पराभूत
औरंगाबाद : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी मंगळवारी कोरोना रुग्णांनी यमदूताला पराभूत केले. जिल्ह्यात २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात ५८ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७९ जण कोरोनामुक्त झाले.
औरंगाबाद जिल्ह्यात आता एकूण रुग्णांची संख्या ४५ हजार ४७६ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४३ हजार ८२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, १ हजार १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४५१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ५८ रुग्णांत मनपा हद्दीतील ५१, ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६७ आणि ग्रामीण भागातील १२ अशा एकूण ७९ रुग्णांना मंगळवारी सुटी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण
उल्कानगरी ४, कासलीवाल हौ. सोसायटी, सिडको १, बालकृष्णनगर, गारखेडा १, जयभवानीनगर १, चैतन्य हौ. सोसायटी १, एन-४, सिडको १, अन्य ४२.
ग्रामीण ७
तालवाडगाव, सिल्लोड १, अन्य ६.