शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध'; 'मनसे'च्या मोर्चाने औरंगाबादचा पैठणगेट परिसर दणाणला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 13:31 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 'मनसे'च्या वतीने आज शहरात पैठणगेट येथून मोर्चा काढण्यात येत आहे.

औरंगाबाद : दुष्काळ नियोजनात आतापर्यंत अपयशी ठरलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी 'मनसे'च्या वतीने आज शहरात पैठणगेट येथून मोर्चा काढण्यात येत आहे. त्यासाठी पैठणगेट येथे मराठवाड्यातून शेतकरी आणि मनसे कार्यकर्ते जमले आहेत. 

पैठण गेट परिसरात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मोर्चात दंडुका आणण्यास पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली. त्यामुळे प्रतिनिधीक स्वरूपात दंडुके आणि उसाचे टिपरू घेऊन मोर्चेकरी सहभागी झाले आहेत. मोर्चात काळे कपडे परिधान करून सहभाग नोंदविण्यात आला आहे. बैलगाडीसह मोर्चात शेतकरी सहभागी झाले आहेत. यावेळी 'शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या यमरूपी सरकारचा निषेध' असे बॅनर लावलेल्या हेल्याने आणि यमाची वेषभूषा साकारलेल्या मोर्चेकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेक ठिकाणचे कार्यकर्ते दाखल होणे बाकी आहे.

या आहेत मागण्याशेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, कापसाला प्रतिक्‍विंटल ८ हजार रुपये भाव, स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्यांच्या मुलांना सरसकट मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना पेन्शन, गत खरीप हंगामातील पिकविमा मिळावा, कोरडवाहु शेतकऱ्यांना हेक्‍टरी ५० हजार, बागायतदारांना एक लाख अनुदान, गाव तेथे चारा छावण्या, मंडळानुसार नव्हे तर संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, कृषिवीज बिले माफ करणे, कर्ज न देणाऱ्या बॅंकांवर कारवाई, बोंडअळीचे अनुदान मिळावे, पाणी टॅंकर सुरु करावे, तिथे प्रतिव्यक्‍ती ५० लीटर पाणी द्यावे, रोजगार हमीचे कामे सुरू करावी, उसाला एफआरपीप्रमाणे भाव, शैक्षणिक शुल्क माफीची अंमलबजावणी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादagitationआंदोलनFarmerशेतकरी