योगदिंडी प्रवासाचे ५० दिवस झाले पूर्ण

By Admin | Updated: April 27, 2016 00:26 IST2016-04-26T23:38:46+5:302016-04-27T00:26:09+5:30

बीड : येथील काकू-नाना प्रतिष्ठान व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या योगदिंडीने मंगळवारी ५० दिवस पूर्ण केले. १०१ दिवसांच्या शिबिरातील अर्धा टप्पाही पूर्ण झाला.

The Yaddindi journey has completed 50 days | योगदिंडी प्रवासाचे ५० दिवस झाले पूर्ण

योगदिंडी प्रवासाचे ५० दिवस झाले पूर्ण


बीड : येथील काकू-नाना प्रतिष्ठान व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या योगदिंडीने मंगळवारी ५० दिवस पूर्ण केले. १०१ दिवसांच्या शिबिरातील अर्धा टप्पाही पूर्ण झाला.
८ मार्च, महिला दिनाच्या मुहूर्तावर शहरातील मुक्ता लॉन्समध्ये शिबिराला प्रारंभ झाला. प्रत्येक भागात दहा दिवस याप्रमाणे दिंडी शहरात सर्वदूर पोहोचणार आहे. सध्या हे शिबीर जालना रोडवरील विठ्ठल साई प्रतिष्ठानच्या प्रांगणात सुरु आहे. शिबिरात राज्यातून आलेल्या विविध नामवंत शिक्षकांनी योगाचे धडे दिले. आजघडीला एक हजाराहून अधिक नागरिक दररोज शिबिरात सहभागी होत आहेत. मंगळवारी शिबिराचा पन्नासवा दिवस होता. निम्मा प्रवास पूर्ण झाल्याने विश्वास आला असून नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने उर्वरित टप्पाही पूर्ण करु, असा विश्वास युवा भारतचे प्रांत प्रभारी अ‍ॅड. श्रीराम लाखे यांनी व्यक्त केला. २१ जून रोजी जागतिक दिनी समारोप होणार आहे. शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन राकॉ जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, अ‍ॅड. लाखे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Yaddindi journey has completed 50 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.