रॉंग साईड मद्यपी कारचालकाची पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST2021-03-28T04:05:42+5:302021-03-28T04:05:42+5:30

या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जावेद पठाण असे मद्यपी कारचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर ...

Wrong side drunk driver beats police | रॉंग साईड मद्यपी कारचालकाची पोलिसांना मारहाण

रॉंग साईड मद्यपी कारचालकाची पोलिसांना मारहाण

या प्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

जावेद पठाण असे मद्यपी कारचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पुंडलिकनगर ठाण्यातील पोलीस कॉंस्टेबल सुनील पवार आणि जालिंदर मांटे हे आज रात्री ड्यूटी संपल्यानंतर दुचाकीने महावीर चौकमार्गे मिल कॉर्नर येथील पोलीस कॉलनीतील घरी जात होते. यावेळी उड्डाणपुलाजवळ त्यांना एक कार रॉंग साईडने येताना दिसली. यामुळे त्यांनी हात दाखवून चालकाला थांबविले आणि रॉंग साईडने का जात आहे असे पवार यांनी विचारले. याचा राग आल्याने जावेदने पोलीस कॉंस्टेबल पवारला मारहाण करण्यास सुरुवात केली. पो. कॉ. मांटे ये त्यांच्या मदतीला धावले असता जावेदने त्यांनाही लाथा घातल्या. कसेबसे त्याला पकडून रिक्षात टाकून ते क्रांती चौक ठाण्यात त्याला नेऊ लागले. यावेळी विवेकानंद कॉलेजजवळ आरोपीने रिक्षाचालक आणि पोलिसांना शिवीगाळ करीत रिक्षाची काच फोडली. क्रांती चौक ठाण्यात नेल्यावर तेथेही त्याने पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांच्या समोर पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी त्याला चांगलाच खाक्या दाखविला. त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविला.

Web Title: Wrong side drunk driver beats police