निर्मिकास काळजी ! पक्ष्यांसाठी निसर्गानेच सुरू केले ‘ज्युस सेंटर’, 'ग्लुकोज आणि प्रोटिन'ची कमतरता पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 05:14 PM2021-04-17T17:14:13+5:302021-04-17T17:17:54+5:30

पक्ष्यांची ही ज्युस सेंटर्स म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून, उन्हाळ्यात आकर्षक रंगांच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय.

Worry the creators! Nature launches 'Juice Center' for birds, 'Glucose and Protein' | निर्मिकास काळजी ! पक्ष्यांसाठी निसर्गानेच सुरू केले ‘ज्युस सेंटर’, 'ग्लुकोज आणि प्रोटिन'ची कमतरता पूर्ण

निर्मिकास काळजी ! पक्ष्यांसाठी निसर्गानेच सुरू केले ‘ज्युस सेंटर’, 'ग्लुकोज आणि प्रोटिन'ची कमतरता पूर्ण

googlenewsNext
ठळक मुद्देपक्ष्यांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होण्यापासून वाचविणारी ही झाडे शहरात अगदीच नगण्य आहेत. पक्ष्यांप्रमाणेच मधमाशा, फुलपाखरे आणि अनेक कीटकांचे उदरभरणही या झाडांद्वारे होते.

औरंगाबाद : होरपळून टाकणाऱ्या उन्हाच्या तडाख्यात थंडावा शोधण्यासाठी आपली पावले नकळत रसवंतीगृह किंवा ज्युस सेंटरकडे वळत असतात. आश्चर्य आणि गंमत म्हणजे अशीच परिस्थिती बऱ्याच पक्ष्यांचीही असते आणि म्हणूनच ऊन वाढले की, ते सुद्धा नकळतपणे निसर्गानेच त्यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध ज्युस सेंटर्सचा शोध घेऊ लागतात.

पक्ष्यांची ही ज्युस सेंटर्स म्हणजे दुसरे, तिसरे काही नसून, उन्हाळ्यात आकर्षक रंगांच्या फुलांनी फुलून आलेली विविध झाडे होय. याविषयी 'लोकमत'ला माहिती सांगताना पक्षी अभ्यासक डॉ. किशोर पाठक म्हणाले की, काटेसावर, पांगारा, पळस, सोनसावर, कौशी या झाडांना उन्हाळ्याच्या दिवसांत जी भडक परंतु अत्यंत आकर्षक दिसणारी फुले येतात, तीच फुले ऐन उन्हाच्या तडाख्यात पक्षांचे संरक्षण करणारी ठरतात. या झाडांच्या फुलांमध्ये असणाऱ्या मधात ग्लुकोज आणि प्रोटिन भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे या मधाचे सेवन केल्यानंतर पक्ष्यांना सनस्ट्रोकचा त्रास होत नाही.

आपल्याकडे पानझडीची झाडे असल्याने उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात पानगळ होते. त्यामुळे या दिवसांमध्ये किडे आणि कीटकांचे प्रमाणही खूप कमी झालेले असते. तसेच पाण्यासाठीही पक्ष्यांना बरीच शोधाशोध करावी लागते. अन्नाचे दुर्भिक्ष्य आणि बऱ्याचदा उष्णतेमुळे केवळ पाणी पिऊन न मिळू शकणारी ऊर्जा यामुळे उन्हाळ्यात पक्ष्यांना या झाडांच्या फुलांमधून मिळते. चष्मेवाला, शिंजीर, सूर्यपक्षी, वटवट्या, शिंपी, पितकंठी चिमणी, कोतवाल, हळद्या, बुलबुल, टोपीवाला, सगळ्या प्रकारच्या मैना, शिक्रा या लहान पक्ष्यांसोबतच पांढऱ्या डोळ्याचा गरुडही पक्ष्यांच्या या ज्युस सेंटरमध्ये बसून मध पित असल्याचे दिसून येते, असेही डॉ. पाठक यांनी सांगितले.

झाडे औषधी गुणधर्माची 
पक्ष्यांना उन्हाळ्यात सनस्ट्रोक होण्यापासून वाचविणारी ही झाडे शहरात अगदीच नगण्य आहेत. इतर झाडांचा बहर जेव्हा ओसरलेला असतो, तेव्हा ही झाडे फुलून येतात. फेब्रुवारी ते मे हा या झाडांचा हंगाम असून मार्च - एप्रिलमध्ये ही झाडे विशेष बहरून येतात. पक्ष्यांप्रमाणेच मधमाशा, फुलपाखरे आणि अनेक कीटकांचे उदरभरणही या झाडांद्वारे होते. या झाडांचा उपयोग नैसर्गिक रंग बनविण्यासाठी होत असून, ही सगळीच झाडे औषधी गुणधर्माची आहेत. त्यामुळे शहरी भागातसुद्धा या झाडांची लागवड होणे आता गरजेचे बनले आहे.

Web Title: Worry the creators! Nature launches 'Juice Center' for birds, 'Glucose and Protein'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.