शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वांत शक्तिशाली LSD ड्रग्जची छत्रपती संभाजीनगरात तस्करी; ‘Gen-Z’ टार्गेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:22 IST

काय आहे एलएसडी ड्रग्ज? चार हजारांना पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराएवढ्या कागदाद्वारे नशा; दुबई रिटर्न, अभियांत्रिकीचा विद्यार्थी बनला ड्रग्ज पेडलर

छत्रपती संभाजीनगर : जगभरात सर्वांत शक्तिशाली ड्रग्जपैकी एक समजल्या जाणाऱ्या एलएसडीचे (लायसरजिक ॲसिड डायएथिलामाइड) तस्कर आता शहरापर्यंत पोहोचले असून, उच्चभ्रू पार्ट्यांसह ‘जनरेशन झेड’ला त्याचा लाखो रुपयांत पुरवठा हाेत आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक विभागने (एएनसी) गुरुवारी रात्री बेगमपुरा परिसरात हे ड्रग्ज विकण्यासाठी आलेला तस्कर खादरी मारुफ अहमद शाहिद अहमद (२६, रा. आरेफ कॉलनी) याला अटक करत त्याच्या ताब्यातून ०.०९ ग्रॅमचे दहा कागदी तुकडे जप्त केले.

एएनसीच्या पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांना एलएसडी ड्रग्जबाबत माहिती प्राप्त झाली होती. २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता बागवडे यांनी पथकासह बीबी-का-मकबरा परिसरात सापळा रचला. त्यात तिकीट घराजवळ मारुफ येताच त्याला ताब्यात घेतले. त्याच्या खिशात एलएसडी ड्रग्जच्या दहा कागदांचे तुकडे आढळले. वैज्ञानिक तज्ज्ञ ललिता ठोके यांनी ते ड्रग्जच असल्याचा निष्कर्ष देताच त्याला अटक करण्यात आली. शुक्रवारी न्यायालयाने त्याला ८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. निरीक्षक गीता बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अंमलदार लालखान पठाण, संदीपान धर्मे, नितेश सुंदर्डे, महेश उगले, विजय त्रिभुवन, सतीश जाधव, छाया लांडगे यांनी ही कारवाई केली.

काय आहे एलएसडी ड्रग्ज?-एलएसडी म्हणजेच लायसरजिक ॲसिड डायएथिलामाइड रसायन असते. हे जगातील अत्यंत महागड्या, धोकादायक ड्रग्जपैकी एक समजले जाते. त्यामुळे याला भारतात बंदी आहे.-याच्या सेवनानंतर १५ ते २० मिनिटांत व्यक्ती आभासी जगात जाते. त्याचे वास्तवाचे भान हरपून जाते व स्थळ-काळाचे तारतम्यही राहत नाही.-साधारण पोस्टाच्या तिकिटाच्या आकाराएवढ्या ब्लाॅटर पेपरवर एका बाजूने सध्याच्या तरुणाईला आकर्षक वाटेल अशी डिजाइन असते, तर मागील बाजूने ड्रग्जचा अंश असतो. एका शिटमध्ये जवळपास १००० तिकिटं असतात.-मिठाच्या क्यूबवर हे तिकीट ठेवून जिभेवर ठेवून याची नशा केली जाते. लाळेद्वारे ते थेट रक्तात मिसळत असल्याने त्याचा मेंदू, मनावर गंभीर व दीर्घकालीन परिणाम होतो.

शहरातील उच्चभ्रू पार्ट्यात सेवनएका तिकिटाची ३ ते ५ हजारांना विक्री होते. आरोपीच्या माहितीनुसार, शहरातील उच्चभ्रू पार्ट्यांत याचे सेवन केले जाते. प्रामुख्याने उच्चभ्रू वसाहतीतील तरुण- तरुणी त्यांचे मुख्य ग्राहक आहेत.

अभियंता, दुबई रिटर्न, पुण्यात वास्तव्यसेव्हन हील परिसरातील नामांकित महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतलेला खादरी मारुफ काही महिने दुबईत वास्तव्यास होता. सध्या काही दिवस पुणे, तर काही दिवस शहरात राहतो.

महानगरांत होत होती विक्री, आता छोटी शहरे टार्गेटमहागडे व शक्तिशाली एलएसडी ड्रग्जचे मेट्रो शहरात सेवन केले जात होते. काही महिन्यांपासून या तस्करांनी छोट्या शहरातील श्रीमंत कुटुंबातील तरुण, तरुणींना लक्ष्य केले.-शहरात कारवाई झालेली असताना वसईमध्ये २ ऑक्टोबर रोजी वसई पोलिसांनी ४ लाख ४० हजारांचे ०.४४० ग्रॅम एलएसडी जप्त केले.-ऑगस्ट महिन्यात हैदराबादमध्ये विशेष पथकाने सहा अभियंत्यांच्या पार्टीत छापा टाकत ०.०५ एलएसडी जप्त केले होते.-जुलै महिन्यात केंद्रीय पथकाने दिल्लीत लाखो रुपयांचे १ हजार १२७ ब्लॉट्स पेपर जप्त केले होते.-फेब्रुवारीत रशिया, अमेरिकेतून तस्करी होत असलेले २७ ग्रॅम एलएसडी जप्त केले होते.-मे महिन्यात गोवा पोलिसांनी ११०.७२ ग्रॅम एलएसडी जप्त केले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात ११ कोटीपर्यंत किंमत होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Powerful LSD Drug Trafficking Busted in Sambhajinagar; Gen-Z Targeted

Web Summary : Sambhajinagar police seized LSD worth lakhs, arresting a trafficker targeting Gen-Z. The drug, consumed in high-society parties, leads to hallucinations. The accused, an engineer with Dubai experience, sourced it from larger cities, now targeting smaller ones.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ