शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'जलयुक्त'ची २४१७ कोटींची कामे चौकशीमुक्त? सरकार बदलताच योजना पुनरुज्जीवनाच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2022 13:20 IST

फेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

- विकास राऊतऔरंगाबाद : मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेत २ हजार ४१७ कोटी रुपयांची कामे करण्यात आली. २०१५ ते २०१९ पर्यंत ही योजना राबविण्यात आली असून, ‘कॅग’ने राज्यभरातील कामांवर ताशेरे ओढल्यामुळे विभागात ६ हजार २० गावांतील १ लाख ७४१६१ कामे संशयाच्या भोवऱ्यात होती. परंतु, आता सरकार बदलल्यामुळे ही योजना पुन्हा बाळसे धरणार असून, मागील सरकारच्या काळातील चौकशीचे आदेशही मागे घेण्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.

३१ मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ‘कॅग’ अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा, खर्च, परिणाम यावरून अनेक प्रश्न ‘कॅग’ने अहवालात उपस्थित केले होते. त्या अनुषंगाने राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जलयुक्त शिवार योजनेतील कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय झाला. या चौकशीमुळे विभागात मागील चार वर्षांत करण्यात आलेली कामे वादात आली. जालना, बीड जिल्ह्यातील कामांप्रकरणी चौकशीअंती कारवाईही झाली.

३१ मार्च २०२० पर्यंत औरंगाबाद जलसंधारण विभाग, विभागीय आयुक्तालय अंतर्गत असलेल्या रेकॉर्डनुसार विभागात ९२.२३ टक्के खर्च करण्यात आला. ९४.१८ टक्के कामे त्यातून पूर्ण झाल्याचे रेकॉर्ड आहे. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील ही महत्त्वाकांक्षी योजना होती. अनेक कामांत गुत्तेदारांची मर्जी राखली गेल्याचे २०१७ मध्ये आरोप झाले. यात अनेक गुत्तेदार हे २०१९ पर्यंतच्या सरकारच्या मर्जीतील होते, असे आरोप विरोधी पक्षाने केले. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त शिवार योजना म्हणून गणली गेली. आता ही योजना पुन्हा राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत.

फेब्रुवारी २०२२ मध्ये नेमली चौकशीफेब्रुवारी २०२२ मध्ये जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. समितीने ६०० तक्रारींच्या अनुषंगाने ११२४ कामांची खुली चौकशी देखील सुरू केली, त्याला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. चार वर्षांत ११.१४ टीसीएम पाणीसाठी साचल्याचे रेकॉर्डनुसार दिसते. २२.२८ लक्ष हेक्टर सिंचन यातून झाल्याचाही दावा करण्यात आला. २०१५ ते २०१९ पर्यंत दरवर्षी ३.३० ते १.५८ टक्के दरम्यान टीसीएम पाणीसाठा या योजनेतून निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

वर्ष --- गावांंची संख्या --- झालेला खर्च२०१५-१६--- १६८५--- ९६३ कोटी२०१६-१७-- १५१८---- ७९० कोटी२०१७-१८--- १२४८---             ३५२ कोटी२०१८-१९---- १५६९----             ३११ कोटीएकूण---- ६०२०-----             २४१७ कोटी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाJalyukt Shivarजलयुक्त शिवार