शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST

जिल्हा परिषद शाळांतील स्थिती : एक-दोन शिक्षकी शाळेवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे होतेय दुर्लक्ष -- औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा ...

जिल्हा परिषद शाळांतील स्थिती : एक-दोन शिक्षकी शाळेवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे होतेय दुर्लक्ष

--

औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त आहे. त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रीत केल्यास व इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल असा सूर विविध शिक्षक संघटनांतून उमटत आहे.

राष्ट्रीय पातळीवर जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्विकारली आहे. मात्र, त्याशिवाय बांधकाम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे, अनेक वेळी मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांना शिक्षकांचा विरोध असताना शिक्षकांना त्या कामात जुंपले जाते. या कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो. मूळ ज्या कामांसाठी नियुक्ती आहे तेच काम जर योग्य पद्धतीने करता येत नसेल तर त्याचा विचार शासनाने करायला हवा. शिक्षकांना काही कामांसाठी मानधन मिळते. ते मानधन सुशिक्षित बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतल्यास त्यांनाही लाभ होईल आणि कामाचा बोझाही शिक्षकांवर येणार नाही. अन्यथा त्यासाठी पर्यायी व्यवस्था शासनाने निर्माण करायला पाहिजे, असे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे यांनी सांगितले.

---

शासकीय योजनांचा भार

---

-शिक्षकांना मतदार यादी, पशु, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वे, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.

-पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकाॅर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमांत शिक्षक केंद्रस्थानी असतो.

-कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.

----

शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त ३६ प्रकारचे कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.

-विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती

---

शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. त्याला शिक्षणाव्यतिरिक्त कामे दिली गेली तर ते करतात. मात्र, शिक्षक मूळ ज्या कामासाठी नेमला त्या अध्यापनावर त्याचा प्रतिकुल परिणाम होऊ नये. यासाठी प्रयत्न करत आहोत.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी

---

७४ एक शिक्षकी शाळांचे हाल

--

जिल्ह्यात ७४ शाळा एक शिक्षकी आहेत. त्यात शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी तर दोन शिक्षकी शाळांचीही मोठी संख्या असल्याने एक शिक्षक शिक्षकेतर कामांत अडकून असतो तेथील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.

---

२,१३१ जिल्हा परिषदेच्या शाळा

--

८,५०३ जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या

---

२,१७,८१३ जि. प. शाळा विद्यार्थी संख्या