मजुरांना ८ दिवसांत पैसे मिळणार

By Admin | Updated: July 13, 2014 00:19 IST2014-07-12T23:48:58+5:302014-07-13T00:19:59+5:30

भोकरदन : तालुक्यातील गोद्री येथील रोहयोअंतर्गत विहिरीवर काम करणाऱ्या मजुरांना आठ दिवसांत थकलेली मजुरी मिळणार आहे.

Workers will get money in 8 days | मजुरांना ८ दिवसांत पैसे मिळणार

मजुरांना ८ दिवसांत पैसे मिळणार

भोकरदन : तालुक्यातील गोद्री येथील रोहयोअंतर्गत विहिरीवर काम करणाऱ्या मजुरांना आठ दिवसांत थकलेली मजुरी मिळणार आहे.
शासनाच्या वतीने महाराष्ट ग्रामीण रोजगार हमी योजनेअंर्तगत बहुसंख्य शेतकऱ्यांनी विहीरीचे खोदकाम केले आहे. हे काम पूर्ण होऊनसुध्दा मजुरांना पैसे मिळत नसल्याने येथील मजुरांनी पंचायत समिती कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता, मात्र आ़ चंद्रकांत दानवे यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात जाऊन गटविकास अधिकारी आऱएस़लोखंडे यांच्याशी चर्चा केली. ज्यांचे पैसे राहिले असतील, ते त्यांना आठ दिवसांच्या आत वितरित करावे, अशी सूचना केली. यावेळी लोखंडे यांनी तशी ग्वाही दिली.
गोद्री येथे एमआरईजीएसअंतर्गत विहिरीचे कामे करण्यात आली आहेत. मात्र कुशल व अकुशल कामाचे गेल्या एक वर्षापासून काही मजुरांचे पैसे मिळाले नाहीत. संरपच राजू निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली ११ जुलै रोजी या मजुरांनी पंचायत समितीला कुलूप लावण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र यादरम्यान आ़दानवे, माजी कृषी सभापती मनीष श्रीवास्तव यांनी मध्यस्थी केली.
याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला. गटविकास अधिकारी आऱएस़ लोखंडे यांनी सांगितले की या मजुरांच्या बँक खात्यावर व्यवहार नसल्याने ते बंद झाले आहेत. त्यामुळे या मजुरांचे पैसे देणे बाकी आहेत. या मजुरांनी खात्यावर व्यवहार सुरू करावेत आणि येत्या आठ दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येतील, असे सांगिंतले . यावेळी सरपंच राजू निकाळजे, शेख एजाज, गणेश बोराडे, सुदाम देठे, पुंजाजी सपकाळ, उत्तम जोगंदडे, शारदा उबाळे, रमेश निकाळजे, यांच्यासह गोद्री येथील मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते़
(वार्ताहर)

Web Title: Workers will get money in 8 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.