शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कामगारांना मिळणार दिवाळी बोनस; व्यापारी म्हणतात, बाजाराची उलाढाल होईल हजार कोटींची

By प्रशांत तेलवाडकर | Updated: October 12, 2022 11:58 IST

सर्वत्र बोनसची चर्चा सुरू झाली. बाजारपेठेतही व्यापारी त्यांच्या कामगारांना बोनस देतात.

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : औद्योगिक क्षेत्रातून बोनसच्या रुपाने यंदा किमान १०० कोटी कामगारांच्या हाती पडणार या बातमीने बाजारपेठेत उत्साह संचारला आहे. शहरातील ३० हजार व्यापारीही त्यांच्याकडील दोन लाख कर्मचाऱ्यांना त्यांचा एक महिन्याचे वेतन बोनसच्या स्वरूपात देणार आहेत. बोनसाचा हा एकत्रित आकडाही १०० कोटींपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याने यंदा बाजारपेठेचीही दिवाळी धुमधडाक्यात होईल, असा अंदाज आहे.

पुढील दोन आठवड्यात बाजारपेठेत १ हजार कोटीची उलाढाल अपेक्षित आहे. दिवाळी दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र बोनसची चर्चा सुरू झाली. बाजारपेठेतही व्यापारी त्यांच्या कामगारांना बोनस देतात. अनेक व्यापारी कामगारांना एक किंवा अर्ध्या महिन्याच्या पगाराएवढा बोनस; मिठाई, भेट वस्तू देतात. काही व्यापारी कर्मचाऱ्यांना नवीन कपडे देत असतात. बोनसची सर्व रक्कम आता बाजारपेठेत येणार आहे. यामुळे बाजारपेठ ग्राहकराजाच्या स्वागतासाठी सजली आहे. कालचा रविवार अनेकांनी ‘खरेदी के नाम’ केला. बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती. सायंकाळी गर्दीत आणखी भर पडली. सर्वाधिक गर्दी कपड्यांच्या शोरुममध्ये होती. लहान मुलांचे, तरुणींचे ड्रेस व महिलांच्या साड्या खरेदीला प्राधान्य देण्यात आल्याचे बघण्यास मिळाले. कापड बाजार, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स बाजार, वाहन बाजार, बांधकाम क्षेत्र व सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे.

औद्योगिकपेक्षा व्यापार क्षेत्रात जास्त बोनस वाटपऔद्योगिक क्षेत्र संघटित आहे. त्यामुळे त्यांची १०० कोटी बोनस वाटप केले ही आकडेवारी लगेच दिसून येते. मात्र व्यापार क्षेत्र विखुरलेले आहे. ३० हजार व्यापारी शहरात असून, दोन लाख कामगार काम करीत आहेत. कामगारांना १८० कोटींचे बोनस यंदा वाटप होण्याची शक्यता आहे. व्यापार क्षेत्रच जास्त नोकरी देते हे यावरून सिद्ध होते.- प्रफुल्ल मालाणी, माजी अध्यक्ष, मराठवाडा चेंबर.

दिवाळीपर्यंत हजार कोटीची उलाढालसर्व बाजारपेठेचे लक्ष बोनसच्या बातमीकडे लागले होते. आता कामगारांना बोनस मिळत असल्याने पुढील दोन आठवडे बाजारात खरेदीची धूम राहणार आहे. या दोन आठवड्यात सुमारे १ हजार कोटीची उलाढाल शहरात होईल.-संजय कांकरिया, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ.

टॅग्स :MONEYपैसाbusinessव्यवसायDiwaliदिवाळी 2022Aurangabadऔरंगाबाद