कंपनीत काम करताना कामगार गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:05 IST2019-07-28T23:05:27+5:302019-07-28T23:05:37+5:30
कंपनीत काम करताना ३० वर्षीय कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास घडली.

कंपनीत काम करताना कामगार गंभीर जखमी
वाळूज महानगर : कंपनीत काम करताना ३० वर्षीय कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसतील अष्टविनायक कंपनीत घडली.
वाळूज एमआयडीसीत प्लॉट नं. सी - २०७ येथे अष्टविनायक इंडस्ट्रिज ही कंपनी आहे. या कंपनीत डीटीएच टीव्हीचे पार्ट बनतात. येथे मुश्ताक समशेर पठाण (३०, रा. भारतनगर, वाळूज) हा काही दिवसांपासून कामाला आहे. शनिवारी दुपारी ३:३० वाजता पठाण कंपनीत कामाला गेला.
मशिनवर काम करत असताना रात्री १०:३० वाजेच्या सुमारास पठाण यांचा हात अचानक मशिनमध्ये अडकला. यात त्याच्या उजव्या हाताची चार बोटे पूर्णपणे तुटल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.