वाहनाच्या धडकेने कामगार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 23:42 IST2019-07-08T23:42:32+5:302019-07-08T23:42:42+5:30
अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी कामगार ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्यावर घडली.

वाहनाच्या धडकेने कामगार ठार
वाळूज महानगर : अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी कामगार ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास रांजणगाव फाट्यावर घडली.
रांजणगाव फाट्यावर एक कामगार हा रांजणगावकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पंढरपूरकडून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रिक्षाने त्याला जोराची धडक दिली. यात कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर चालक रिक्षासह फरार झाला. मृत कामगाराचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी मृत कामगारास शासकीय रुग्णालयात नेले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात नोंद नसल्याचे सांगण्यात आले.