दुचाकीच्या धडकेत कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 23:32 IST2019-03-30T23:32:29+5:302019-03-30T23:32:39+5:30
भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी वाळूज एमआयडीसीत घडली

दुचाकीच्या धडकेत कामगार जखमी
वाळूज महानगर : भरधाव दुचाकीने जोराची धडक दिल्याने कामगार जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी वाळूज एमआयडीसीत घडली.
परमेश्वर अण्णा मुरकूट (४०, रा. हनुमान नगर, रांजणगाव) हे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत कामाला आहेत. शनिवारी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास लीलासन कंपनी जवळ भरधाव दुचाकीने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. यात ते जमखी झाले. घटनेनंतर दुचाकीस्वार फरार झाला. मुरकूट यांना सिडको वाळूज महानगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.