दुधगाव येथे कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:03 IST2017-09-30T00:03:30+5:302017-09-30T00:03:30+5:30

वीजपुरवठा सुरळीत करीत असताना विजेचा धक्का लागून एका वीज कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली.

Worker's death at Dudhgaon | दुधगाव येथे कामगाराचा मृत्यू

दुधगाव येथे कामगाराचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी : वीजपुरवठा सुरळीत करीत असताना विजेचा धक्का लागून एका वीज कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली.
जिंंतूर तालुक्यातील दुधगाव येथे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. यासाठी गावातीलच माणिक नारायण भागवत (वय ४५) हा कामगार काम करीत होता. वीज पुरवठ्याचे काम करण्यासाठी माणिक भागवत हे विद्युत खांबावर चढले होते. यावेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने यामध्ये माणिक भागवत यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुंजाजी नारायण भागवत यांच्या खबरीवरून बोरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. जमादार एच.आर. आनंदपुरे हे तपास करीत आहेत.

Web Title: Worker's death at Dudhgaon