दैनिक वेतनावरील कामगारांना सहा महिने मिळाली मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 22:42 IST2019-01-08T22:41:44+5:302019-01-08T22:42:04+5:30
मनपाच्या दैनिक वेतनावरील २१२ कामगारांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळाली नव्हती. त्यांच्या प्रश्नाला लोकमतने नुकतीच वाचा फोडली होती.

दैनिक वेतनावरील कामगारांना सहा महिने मिळाली मुदतवाढ
औैरंगाबाद : मनपाच्या दैनिक वेतनावरील २१२ कामगारांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना मुदतवाढ मिळाली नव्हती. त्यांच्या प्रश्नाला लोकमतने नुकतीच वाचा फोडली होती. त्याची दखल घेऊन अस्थापना विभागात दडपलेल्या फाईलवर सही होऊन मनपाचे २०४ आणि सातारा वॉर्डाचे ८ अशा एकूण २१२ कर्मचाºयांना ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.
दैनिक वेतनावर काम करणाºया कर्मचाºयांकडून कामे केली जातात. ते नियमित कामेदेखील करीत असून, वेतन रखडल्याने त्यांना काटकसरीत जीवन जगावे लागत होते. ऐन दिवाळीतच या कर्मचाºयांच्या होणाºया घुसमटीवर प्रकाश टाकण्यात आला होता. त्या कर्मचाºयांच्या प्रश्नांची सोडवणूक मनपा प्रशासनाने केल्याने त्या कर्मचाºयांत आनंदाचे वातावरण पसरले आहे; परंतु दरवेळी वेतनाचा विषय काही तांत्रिक अडचणीमुळे रोखू नये, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
सातारा-देवळाई वॉर्ड कार्यालय अधिकारी मनोहर सुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कर्मचाºयांचे काम सुरू असून, त्यांची रखडलेली आॅर्डर निघाल्याचे सांगण्यात आले. ६ महिन्यांची मुदतवाढ मिळालेली असून, अद्याप ती आॅर्डर टपालात असून पोहोचलेली नाही.