कामगाराची दुचाकी लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:06 IST2021-09-23T04:06:30+5:302021-09-23T04:06:30+5:30
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातून कामगाराची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भगवान रावसाहेब लंगोटे (रा.पेंडापूर) ...

कामगाराची दुचाकी लांबविली
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातून कामगाराची दुचाकी लांबविणाऱ्या चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भगवान रावसाहेब लंगोटे (रा.पेंडापूर) यांनी ३१ ऑगस्टला दुचाकी ( एम.एच.२०, डी.एस.०५७७) बजाज मटेरियल गेटसमोर उभी केली होती. चोरट्याने संधी साधून ही दुचाकी चोरुन नेली.
-----------------------
अनिरुद्ध कळकुंबे यांना पुरस्कार
वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील पी. एम. ज्ञानमंदिर शाळेचे शिक्षक अनिरुद्ध कळकुंबे यांना निर्वाण फाउंडेशनच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फाउंडेशनच्यावतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आदी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीची निवड करून त्यांना पुरस्कार देण्यात येतो. नाशिक येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात अनिरुद्ध कळकुंबे यांना शिल्पी आवस्थी, आरती हिरे, विमलबाई बोथरे, नीलेश आंबेडकर आदींच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
फोटो क्रमांक- अनिरुद्ध कळकुंबे
--------------
महावीर चौकातील पथदिवे निद्रावस्थेत
वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसीच्या महावीर चौकातील पथदिवे निद्रावस्थेत असल्याने नागरिकांना अंधारातून ये-जा करावी लागत आहे. एमआयडीसी प्रशासनाने या चौकातील पथदिवे सुरू करण्याची मागणी त्रस्त नागरिकांकडून केली जात आहे.
--------------------------