ईस्माईल मन्नू पटेल (३८, रा. साजापूर) हा वाळूज एमआयडीसीतील एका औषधी कंपनीत हेल्पर म्हणून काम करतो. कंपनीत शनिवारी कच्चा माल खाली करून ट्रकचालक (एमएच २० डब्ल्यू ८५०१) दुसऱ्या प्लांटमध्ये निघाला होता. कंपनीतून ट्रक बाहेर जात असताना सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास इस्माईलला जोराची धडक दिली. यात इस्माईल गंभीर जखमी झाला होता. त्याला बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर इस्माईल यास नातेवाईकांनी कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास इस्माईलचा मृत्यू झाला. लियाकत याच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रक धडकेने कामगाराचा मृत्यू
By | Updated: December 2, 2020 04:09 IST