तीन महिन्यांपासून वेतनाविना काम

By Admin | Updated: June 15, 2014 00:37 IST2014-06-15T00:27:17+5:302014-06-15T00:37:26+5:30

वसमत : जिल्ह्यातील तिन्ही नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. वेतन त्वरित न मिळाल्यास काम बंद करण्याचा

Work for three months without pay | तीन महिन्यांपासून वेतनाविना काम

तीन महिन्यांपासून वेतनाविना काम

वसमत : जिल्ह्यातील तिन्ही नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नाही. वेतनाअभावी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. वेतन त्वरित न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा वसमत न.प.च्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. वेतनाच्या प्रश्नावरून न.प. कर्मचारी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
नगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान राज्यातील ७८ नगरपालिकांकडे अतिरिक्त देण्यात आले होते. एकट्या वसमत नगरपालिकेकडे सुमारे १२ कोटी रुपये जादा अनुदान देण्यात आल्याचा प्रकार शासनाच्या लेखा परीक्षणात समोर आला होता. त्यानंतर शासनाने ज्यादा रक्कम अदा झालेल्या नगरपालिकांकडून वसुली सुरू केली आहे. नगरपालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनासाठीच्या सहाय्यक अनुदानातून ५० टक्के कपात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होणे सुरू झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याने ते आर्थिक संकटाचा मुकाबला करत आहेत. विशेष बाब अशी की शासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सहाय्यक अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले आहे. २० मे रोजी अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. मात्र अद्यापपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांच्या वेतन अदा करण्यासाठीच्या बिलावर स्वाक्षरीच न झाल्याने अजूनपर्यंत वेतन अदा झाले नसल्याचे समोर आले आहे. याबाबत वसमत नगर परिषद कर्मचारी संघटनेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यात वेतन न मिळाल्यास वसमत नगर परिषदेचे कर्मचारी कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याचे नमूद केले आहे.
न.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनातील अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील न.प. प्रशासन विभागाचे प्रमुख कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शासनाकडूनच अनुदान येण्यास विलंब झाला आहे.
कर्मचाऱ्यांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन करण्यासाठीचे बिल तयार करण्यात आले आहे. हे बिल पाच दिवसांपूर्वी पाठविले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वाक्षरी होताच वेतनाच्या धनादेश संबंधित न.प.कडे वर्ग होणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. (वार्ताहर)
आंदोलनाचा इशारा
नगरपालिका कर्मचाऱ्यांना वेतनासाठी मिळणारे सहाय्यक अनुदान राज्यातील ७८ नगर पालिकांकडे अतिरिक्त देण्यात आले होते.
एकट्या वसमत पालिकेकडे सुमारे १२ कोटी रुपये जादा अनुदान देण्यात आल्याचा प्रकार लेखा परीक्षणात समोर आला होता.
शासनाने ज्यादा रक्कम अदा झालेल्या नगरपालिकांकडून वसुली सुरू केली आहे.
नगरपालिका कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनासाठीच्या सहाय्यक अनुदानातून ५० टक्के कपात सुरू झाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन अनियमित होणे सुरू झाले आहे.
वसमत, कळमनुरी व हिंगोली नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही.
वेतनासाठीचे अनुदान जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. मात्र अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून बिलावर स्वाक्षरीच झाली नसल्याचे समोर आले आहे.
कर्मचारी आंदोलन करणार

Web Title: Work for three months without pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.