दुष्काळात मिळतेय हजारो मजुरांना काम

By Admin | Updated: December 22, 2014 00:58 IST2014-12-22T00:45:18+5:302014-12-22T00:58:18+5:30

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून अनेक जण स्थलांतर करत आहेत.

Work for thousands of laborers in drought | दुष्काळात मिळतेय हजारो मजुरांना काम

दुष्काळात मिळतेय हजारो मजुरांना काम


गजेंद्र देशमुख , जालना
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातून अनेक जण स्थलांतर करत आहेत. हे स्थलांतर रोखण्यासाठी मजुरांना स्थानिक पातळीवरच काम मिळावे म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत हजारो मजुरांना काम देण्याचा प्रयत्न सुरु आहे. दर आठवड्यात साधारणपणे ६ हजार मजुरांना कामे देऊन त्यांना दुष्काळात सावरण्याचा प्रयत्न सुरु आहे.
जिल्ह्यात ९२९ गावांमध्ये अंतिम आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. त्यामुळे सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात स्थिती भयावह आहे. पाणीटंचाई व नापिकीमुळे मजुरांच्या हाताला काम नाही. मजुरांना काम मिळावे म्हणून जिल्हा प्रशासनाने नियोजन केले. त्यात तालुकानिहाय प्रत्येक गावातील मजुरांना काम मिळेल यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले. योजना सुरु झाल्यापासून २० हजार २२५ कामे सुुरु आहेत. आजपर्यंत आठही तालुके मिळून १३ हजार १९६ मजुरांना काम देण्यात आले आहे. शुक्रवारपर्यंतचा अहवाल पाहता अंबड ९, बदनापूर १, भोकरदन ७, घनसावंगी ७, जालना १४, मंठा २९, परतूर ५१ मिळून ११८ कामे सुरु आहेत. या कामांवर गत आठवड्यात ६०५४ मजुरांना काम देण्यात आले. तहसील व पंचायत समितीस्तरावरुन ही कामे करण्यात येत आहे. कुशल व अकुशल मजुरांकडून कामे करुन घेण्यात येत आहेत.
अंबड, ६१.११, बदनापूर ३१.३३, भोकरदन ४०.६४, घनसावंगी ५२.०८, जाफराबाद ५१.८२, जालना ३०. ९९, मंठा ४२.३२, परतूर ३१.३९ लाख मिळून ३९ कोटी ४९ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.४
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत आठही तालुके मिळून ३ हजार ९५४ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. यात प्रामुख्याने अंबड ३०३, बदनापूर १०४३, भोकरदन १०७९, घनसावंगी ४७६, जाफराबाद- २८३, जालना - २०० , मंठा ५५, परतूर ४८५ सिंचन विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली. दरम्यान, ८ हजार ६३७ विहिरींपैकी ४ हजार ७१३ विहिरींची कामे अपूर्ण आहेत.
मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून सिंचन विहिरी, लघू तसेच मध्यम प्रकल्पातील गाळ काढणे, तुतीलागवड, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावगड करणे, वैयक्तिक शौचालय बांधणी तसेच फळबाग लागवड आदी कामे राबविली जात आहेत. याकामात हजारो मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.

Web Title: Work for thousands of laborers in drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.