शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

राज्य मागास वर्ग आयोगाचे निधी अभावी रखडले सर्वेक्षणाचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 13:20 IST

सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संस्थांना कामाचा मोबदला देण्यासाठीचा निधीच वेळेत उपलब्ध झाला नसल्यामुळे सर्वेक्षणाच्या कामाला तब्बल चार महिने उशीर झाला आहे.

ठळक मुद्दे यामुळे अंतिम अहवाल येण्यासाठी दिवाळी उजाडणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. यानंतरच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार आहे.

 - राम शिनगारे 

औरंगाबाद : राज्य मागास वर्ग आयोगाने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी जनसुनावणी आणि सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जनसुनावणीचे काम मागील महिन्यातच पूर्ण झाले. मात्र, सर्वेक्षणासाठी नेमलेल्या संस्थांना कामाचा मोबदला देण्यासाठीचा निधीच वेळेत उपलब्ध झाला नसल्यामुळे सर्वेक्षणाच्या कामाला तब्बल चार महिने उशीर झाला आहे. यामुळे अंतिम अहवाल येण्यासाठी दिवाळी उजाडणार असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. यानंतरच मराठा आरक्षणाचा निर्णय होणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला १६ आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. यातील मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-शिवसेना युती सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात २,५०० पानांचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. मात्र, आरक्षण देण्याची प्रक्रिया आणि निर्णय घेण्यासाठी घटनात्मक अधिकारी राज्य मागास वर्ग आयोग आहेत. यामुळे न्यायालयाची परवानगी घेत मराठा आरक्षणाचे प्रकरण ३ जुलै २०१७ रोजी आयोगाकडे पाठविले.

आयोगाने सुरुवातीला २,५०० पानांचे शपथपत्र,  न्यायमूर्ती खत्री अहवाल, न्यायमूर्ती बापट अहवाल, गोखले इन्स्टिट्यूटचे सर्वेक्षण, राणे समितीच्या अहवालाचा अभ्यास केला. मात्र, यात सद्य:स्थिती नसल्यामुळे आयोगाने १९ आॅगस्ट २०१७ रोजी  झालेल्या बैठकीत जनसुनावणी आणि सर्वेक्षणाद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण तपासणीचा निर्णय घेतला. 

सर्वेक्षणासाठी लागणारी यंत्रणा आयोगाकडे नसल्यामुळे विभागवार विविध संस्थांकडून सर्वेक्षण करून घेण्याचा निर्णय नोव्हेंबर महिन्यात झाला. डिसेंबरमध्ये संस्थांची निवडही केली. तसेच राज्य सरकारची परवानगी घेत निधी देण्याची मागणी सामाजिक न्याय विभागाकडे डिसेंबर महिन्यातच आयोगाने केली. मात्र, सामाजिक न्याय विभागाच्या दिरंगाईमुळे सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांना मे २०१८ च्या मध्यात निधी उपलब्ध झाला. यानंतर या संस्थांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांनी भ्रमणध्वनीवर बोलण्यास नकार दिला.

सरकारी अनास्थाही भोवलीआयोगाने मराठा समाजाची स्थिती जाणून घेण्यासाठी डिसेंबर २०१७ मध्येच राज्य सरकारच्या सर्वच विभागांना पत्रे पाठवून मराठा समाजातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती मागवली होती. मात्र, ही माहिती देण्यास राज्य सरकारच्या विभागांना जून महिना उलटला आहे. सद्य:स्थितीत आयोगाकडे दोन-तीन विभागांचा अपवाद वगळता सर्व माहिती उपलब्ध झाली आहे.

या संस्था करताहेत सर्वेक्षणाचे काममराठा समाजाची स्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई-कोकण विभागांत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, पश्चिम महाराष्ट्रात गोखले इन्स्टिट्यूट, विदर्भात शारदा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, उत्तर महाराष्ट्रात गुरुकृपा संस्था आणि मराठवाड्यात छत्रपती शिवाजी प्रबोधिनी सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. यात केवळ मराठवाड्यात सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित विभागांतील काम अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुढील महिन्यात विश्लेषण, अहवाल लेखनआयोगाने राज्यभरात आयोजित केलेल्या जनसुनावण्यांचा कार्यक्रम २९ जून रोजी पूर्ण झाला आहे. या जनसुनावण्यांमध्ये आलेल्या निवेदनांचे वर्गीकरण करण्याचे काम सुरू असून, पुढील महिन्यात माहितीचे विश्लेषण केले जाणार आहे. ४तसेच संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अहवालाचे लेखनही पुढील महिन्यात सुरू होईल. आयोगाच्या नियोजनानुसार अंतिम अहवालासाठी आक्टोबर महिना उजडणार आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाreservationआरक्षणState Governmentराज्य सरकार