एकमेकांना दोष देण्यापेक्षा पूरक म्हणून काम करा
By Admin | Updated: June 4, 2014 01:32 IST2014-06-04T00:43:13+5:302014-06-04T01:32:56+5:30
उस्मानाबाद : दिवसेंदिवस प्रशासनात बदल होत आहेत. प्रशासन अधिक गतिमान होत आहे.

एकमेकांना दोष देण्यापेक्षा पूरक म्हणून काम करा
उस्मानाबाद : दिवसेंदिवस प्रशासनात बदल होत आहेत. प्रशासन अधिक गतिमान होत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे अधिक गतीने होण्यासाठी शासन यंत्रणांनी काम करावे, असे सांगतानाच विविध यंत्रणांनी एकमेकांना दोष देण्यापेक्षा पूरक म्हणून आणि समन्वयाने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले, येथील जिल्हा परिषद सभागृहात गतिमानता प्रशासकीय अभियानासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमादरम्यान केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहण्यात आली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, प्रभोदय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार आदींची प्रमुख उपस्थिती होती. चारही विभागाचेउपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी, रवींद्र गुरव, संतोष राऊत, सचिन बारवकर, सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ कृषी अधिकारी, विस्ताराधिकारी आदी उपस्थित होते. विविध यंत्रणांच्या प्रमुखांनी दरमहा चांगले काम करणार्या आणि कामात कुचराई करणार्यांची यादी तयार करण्याचे निर्देश देत प्रशासन आता बदलले आहे. त्यामुळे कर्मचार्यांनीही बदलले पाहिजे. त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण घ्या, असेही त्यांनी सांगितले. अपर जिल्हाधिकारी पाटील यांनी महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभाग या यंत्रणांनी एकत्रितपणे गावा-गावांत जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणे व सोडविणे तसेच विविध योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी) कामचुकारांना संरक्षण देऊ नका दन्ौंदिन कामकाजात कामचुकारपणा करणार्यांची गय करू नका. तसेच चांगले काम करणार्यांना प्रोत्साहन द्या, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले, प्रत्येक गावांच्या एकात्मिक विकासाच्या दृष्टीने योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्या. ग्रामसेवक, तलाठी भेट नाहीत, अशी तक्रार अनेकदा येते. संबंधित विस्ताराधिकारी, मंडळ अधिकारी यांनी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामे न करणार्यांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षण देऊ नका. कार्यालयीन बाबी परिपूर्ण ठेवा. नागरिकांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. कार्यालय प्रमुख अथवा विभाग प्रमुखांनी आपल्या अधिपत्याखालील कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बेशिस्त कर्मचार्यांबाबत कडक कार्यवाहीचे निर्देशही त्यांनी दिले.