मराठवाड्यात २०४ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू

By Admin | Updated: March 6, 2015 00:33 IST2015-03-06T00:29:39+5:302015-03-06T00:33:11+5:30

औरंगाबाद : जलयुक्तशिवार अभियानांतर्गत राज्य सरकारने मराठवाड्याला ६४ यंत्रे उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे.

Work on removal of mud in Marathwada, 204 places | मराठवाड्यात २०४ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू

मराठवाड्यात २०४ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू

औरंगाबाद : जलयुक्तशिवार अभियानांतर्गत राज्य सरकारने मराठवाड्याला ६४ यंत्रे उपलब्ध करून दिली असून, त्याद्वारे तलावातील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झाली आहे. सध्या विभागात एकूण २०४ ठिकाणी तलावांमधील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ५७ ठिकाणी गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत जलसंधारणाची विविध कामे करून भूजल पातळी तसेच प्रकल्पांची सिंचन क्षमता वाढविली जाणार
आहे.
त्याचाच भाग म्हणून सरकारने मराठवाड्यातील रिकाम्या तलावांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी जलसंपदाकडील यंत्रे प्रत्येक जिल्ह्याला वितरित करण्यात आली असून, त्याद्वारे गाळ काढण्याच्या कामाला सुरुवातही झाली
आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात १२, जालना जिल्ह्यात ७, बीड जिल्ह्यात ६, परभणी जिल्ह्यात ५७, हिंगोली जिल्ह्यात ७, नांदेड जिल्ह्यात ५१, लातूर जिल्ह्यात ४६ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १८ ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Work on removal of mud in Marathwada, 204 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.