शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

“कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण ते क्षेत्र आपला पेशा बनवा; धंदा नव्हे”; नाना पाटेकरांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 13:16 IST

प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा सल्ला; एमजीएममध्ये आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवास सुरुवात

छत्रपती संभाजीनगर : आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू ते क्षेत्र आपला पेशा व्हायला हवा धंदा नाही. कलाकाराची सुख आणि दु:खाची व्याख्या बदलायला हवी. ‘नाम’च्या माध्यमातून काम करताना राज्यातील शेतकऱ्यांना जेव्हा भेटलो, तेव्हा मला लक्षात आले की, त्यांच्या दुःखापुढे आपलं दुःख काहीच नाही. आपल्या दु:खापेक्षा खूप मोठी दु:खं या जगात आहेत, असे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले.

एमजीएम विद्यापीठात असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज (एआययू) च्या ३९ व्या आंतर विद्यापीठीय सेंट्रल झोन युवा महोत्सवाचे उद्घाटन नाना पाटेकर यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी एमजीएमचे उपाध्यक्ष डॉ.पी.एम. जाधव, विश्वस्त भाऊसाहेब राजळे, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, ‘एआययू’चे अधिकारी डॉ. निर्मल जौरा, दीपक कुमार झा, महोत्सवाचे सचिव डॉ. शिव कदम यांची उपस्थिती होती.

यावेळी नाना पाटेकर म्हणाले, आपण स्वत:कडे पाहायला पाहिजे. स्वत:तील उणिवा समजणे आवश्यक आहे. हे एकदा समजले की, आयुष्य सोपे होऊन जाते. आज पेक्षा उद्या कसे उत्तम होता येईल, याचा विचार करत पुढे जाणे आवश्यक आहे. बदल जर कोणी करू शकेल तर तो देशाची तरुणाई करेल, यावर मला विश्वास आहे. आपण जागरूकपणे पुढे जात असताना गर्दीचा भाग बनू नका. आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल असून ते तुमच्या हातात आहे. जे काही करायचे आहे ते मनातून करायचे. जगात कोणतीही क्रांती झाली तर त्याची सुरुवात रंगमंचावरून झालेली आहे. आज आपल्या आजूबाजूला राजकीय, सामाजिक जे काही सुरू आहे त्यावर आपण आपल्या अभिनयाने भाष्य करू शकतो. ५० वर्षे झाली या क्षेत्रात काम करत असूनही मी स्वत:ला कलाकार म्हणत नाही, कारण आणखी मला खूप काही शिकायचे असल्याचे पाटेकर यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष जाधव, कुलगुरू सपकाळ आणि डॉ. जौरा यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी केले. सूत्रसंचालन ऐश्वर्या थावरे आणि सांझ यांनी केले. डॉ. शिव कदम यांनी आभार मानले.

‘जगाव की मरावं’...ने जिंकली मनेपाटेकर यांनी विविध राज्यातील कलावंत असल्यामुळे हिंदीतून संवाद साधला. शेवटी विद्यार्थ्यांनी संवाद सादर करण्याची मागणी केली. त्यावर नानांनी नटसम्राट चित्रपटातील ‘जगाव की मरावं हा एकच सवाल आहे. ह्या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं?’ हा डायलॉग सादर केला. त्यास युवकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

सैन्याला सन्मान मिळावाप्रहार चित्रपट करताना मी ३ वर्षे सैन्यात घालवले. त्यामुळे माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले. सीमेवर २०-२२ वर्षांची मुले देशाचे संरक्षण करतात. दुसऱ्या देशात सैनिक आला तर त्याला राष्ट्रपतीही सॅल्युट करतात, पण आपल्या देशात सैन्याला जो सन्मान मिळायला हवा तो मिळत नसल्याची खंत नाना पाटेकर यांनी व्यक्त केली.

तीन राज्यातील ११०० कलावंत‘एआययू’च्या विभागीय महोत्सवात मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्यातील २३ विद्यापीठातील ११०० पेक्षा अधिक विद्यार्थी कलावंतांनी सहभाग घेतला आहे. हा महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Passion over Profit: Nana Patekar's Advice to the Youth

Web Summary : Nana Patekar urged youth to pursue passion, not profit. He highlighted farmers' struggles, emphasizing gratitude. He stressed self-awareness and continuous improvement. Patekar advocated for honoring soldiers and encouraged artistic expression for social change.
टॅग्स :Nana Patekarनाना पाटेकरmgm campusएमजीएम परिसर