शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

बँक कर्मचाऱ्यांचे फिती लावून काम

By admin | Updated: October 11, 2014 00:39 IST

औरंगाबाद : राष्ट्रीयीकृत बँकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून आपले कामकाज केले.

औरंगाबाद : राष्ट्रीयीकृत बँकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून आपले कामकाज केले. कारण, केंद्र शासन व इंडियन बँक असोसिएशनने पगारवाढीचा निर्णय लोंबकळत ठेवला आहे. ११ टक्क्यांपेक्षा अधिक पगारवाढ करण्यास केंद्र शासन तयार नसल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळी फीत प्रत्येकाने बांधली होती. शुक्रवारी सकाळी बँक उघडली तेव्हा सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळी फीत लावली होती. हे पाहून ग्राहकांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र, नंतर सर्व परिस्थिती लक्षात आली. जिल्ह्यातील २६ राष्ट्रीयीकृत बँकांच्या सुमारे ५ हजार कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला. यासंदर्भात अखिल भारतीय स्टेट बँक आॅफ हैदराबाद स्टाफ असोसिएशनचे महासचिव जगदीश भावठाणकर यांनी सांगितले की, बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांना २५ टक्के वेतनवाढ करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. यासंदर्भात इंडियन बँक असोसिएशन व युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन यांच्या आजपर्यंत १३ बैठका झाल्या. मात्र, केंद्र शासनाच्या वतीने इंडियन बँक असोसिएशनने अधिक पगारवाढ करण्यास असमर्थता दर्शविली. कर्मचारी व अधिकाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने २५ ऐवजी २३ टक्के पगारवाढ करण्यात यावी, अशी मागणी केली. मात्र, केंद्र शासन ठाम आहे. परिणामी, राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची पगारवाढ झाली नाही. केंद्र सरकारने २३ टक्के पगारवाढ केली नाही, तर पुढील महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा भावठाणकर यांनी दिला.