प्राधिकरणाची कामे निकृष्ट; अधिकाºयांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 01:01 IST2017-09-13T01:01:58+5:302017-09-13T01:01:58+5:30
: पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत पैठण शहरात निकृष्ट कामे होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकाºयांनी या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली

प्राधिकरणाची कामे निकृष्ट; अधिकाºयांवर होणार कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत पैठण शहरात निकृष्ट कामे होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकाºयांनी या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या कामांना जबाबदार अधिकाºयांवर कारवाई करण्याचा ठराव येथील बैठकीत घेण्यात आला. यामुळे अधिकाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आता काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगळवारी (दि.१२) पैठण येथे पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकाºयांनी नवलकिशोर राम यांनी शहरात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी येथे सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून निकृष्ट होत असलेल्या कामांना जबाबदार असलेले कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह आदी अधिकाºयांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यामुळे या अधिकाºयांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
बैठकीनंतर जिल्हाधिकारी म्हणाले, पैठण शहरात प्राधिकरणांतर्गत विकासकामांसाठी २८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्राधिकरणाच्या माध्यमातून पैठण शहरात विविध योजना राबवून नागरी सुविधांसह पर्यटक व भाविकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मंजूर झालेल्या निधीतून सह्याद्री हॉटेल ते पाटेगाव रस्ता, भाजी मार्केट ते नेहरू चौक रस्ता, पाणीपुरवठा योजना, घनकचरा योजना आदी कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
या बैठकीला आ. संदीपान भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, तहसीलदार महेश सावंत, महेश जोशी, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, आबासाहेब बरकसे, भूषण कावसनकर, तुषार पाटील, ईश्वर दगडे, कृष्णा मापारी, सतीश पल्लोड, दिलीप मगर, हसन्नोद्दीन कट्यारे, नामदेव खरात, भाऊ लबडे, कपिल पहेलवान, विजय सुते, गणेश मडके, आशिष मापारी, अजय परळकर उपस्थित होते.