शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

१८ टक्के मते घेऊन जिंकले पण ३२ टक्के मते घेऊनही पराभूत; खैरेंच्या जयपराजयाचा लेखाजोखा 

By नजीर शेख | Updated: May 4, 2024 15:59 IST

चारवेळा विजय आणि एकदा पराभव पाहिलेले चंद्रकांत खैरे यावेळी देखील आहेत रणांगणात

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उद्धवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे सध्या सहाव्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चारवेळा विजय आणि एकदा पराभव पाहिलेल्या खैरे यांनी एकदा केवळ १८ टक्के मते घेऊन विजय मिळविला आहे तर ३२ टक्के मते घेऊनही त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत दिवंगत दिग्गज नेते ए. आर. अंतुले यांना पराभूत केलेले चंद्रकांत खैरे हे चारवेळा खासदार झाले आहेत. २०१९ मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये खैरे यांना ३२.०८ टक्के मते पडली तर त्यांचे विजयी प्रतिस्पर्धी एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना ३२.४५ टक्के मते मिळाली. खैरे यांचा निसटता पराभव झाला. मात्र २००९ मध्ये खैरे यांना केवळ १८.०५ टक्के मते मिळूनही त्यांचा विजय झाला. त्यावेळी काँग्रेसचे उत्तमसिंग पवार आणि अपक्ष शांतीगिरी महाराज निवडणूक रिंगणात होते. अर्थात २००९ मध्ये मतदानाची टक्केवारी फक्त ५१.५६ इतकीच होती. २००९ पेक्षा २०१९ मध्ये खैरे यांनी १४.४० टक्के मते जास्त घेऊनही ते खासदार होऊ शकले नाहीत. २००४ मध्ये तर खैरे यांनी सुमारे ५२ टक्के इतकी मते घेतली होती. त्यावेळी ते १ लाख २१ हजार ९२३ इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.

खैरेंचा सर्वांत मोठा विजयचंद्रकांत खैरे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसचे नितीन पाटील यांच्यावर मिळविलेला विजय त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. त्यावेळी खैरे यांनी पाटील यांना १ लाख ६२ हजार मतांनी पराभूत केले होते. सर्वाधिक मताधिक्याचा विजय असला तरी टक्केवारीचा विचार करता त्यावेळी खैरे यांना ३२. ७७ टक्के आणि पाटील यांना २२.५८ टक्के मते मिळाली.

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Chandrakant Khaireचंद्रकांत खैरे