शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच महिलेसोबत दोघांचे अनैतिक संबंध; अडसर ठरणाऱ्या पतीस मिळून संपवले, केले दोन तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 16:56 IST

महिलेसोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचे दोघांनी त्याच्याच शेतात केले दोन तुकडे; एक फेकला विहिरीत तर दुसरा फेकला गावाबाहेर

पिशोर (औरंगाबाद) : शनिवारी दहिगाव शिवारात एक व्यक्तीचा दोन तुकडे करून फेकून देण्यात आलेला मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटविण्यासह या खुनाचा उलगडा करण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच त्या व्यक्तीचा काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. संदीप बाळा मोकासे (वय ३५, रा. शफेपूर, पिशोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दहिगाव शिवारात एका कॅरिबॅगमध्ये व खताच्या गोणीत भरून रस्त्यापासून दीडशे फुटावर लांब टाकलेला एक अर्धवट मृतदेह काहींना आढळला होता. पिशोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो ताब्यात घेतला. शनिवारी रात्रभर सपोनि. कोमल शिंदे व सहकाऱ्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र मृतदेहाचा कमरेखालील भाग मिळाला नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद घाटीत नेला असता, मारहाण करून, गळा कापून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सपोनि शिंदे यांनी तपासचक्रे फिरवून कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करून तपासकामी पाठविले. यात शफेपूर येथील संदीप बाळा मोकासे हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या पत्नीचे गावातील सुनील सावजी हरणकाळ व शशिकांत ऊर्फ (छोटू) नारायण मोकासे यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृताच्या उसाच्या शेतात पाहणी केल्यानंतर तेथे पोटाच्या आतडीचा काही भाग मिळाला. यानंतर मृत हा संदीप बाळा मोकासे असल्याचे निष्पन्न झाले. हा तपास सपोनि. कोमल शिंदे, उपनिरीक्षक विजय आहेर, उपनिरीक्षक विजय जाधव व स्टाफ, सहा. फौजदार सोनाजी तुपे, माधव जरारे आदींनी केला.

धारदार शस्त्राने डोक्यात मारून कापला गळासुनील सावजी हरणकाळ व शशिकांत नारायण मोकासे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याला शेतात नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात मारून गळा कापल्याचे सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे कमरेपासून दोन तुकडे केले. धडाचा भाग कॅरिबॅगमध्ये बांधून गोणीत टाकून दहिगाव शिवारात टाकला. कमरेखालील भाग जवळच गट नंबर ९५ मधील विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले.

विहिरीतून काढला कमरेपासूनचा अर्धा भागआरोपींनी संदीप मोकासेचा शरीराचा अर्धा भाग कापून विहिरीत फेकला होता. पोलिसांनी त्या विहिरीतून गळाच्या साहाय्याने पांढऱ्या रंगाची गोणी काढली. यात कमरेखालचा भाग कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय राजभोज यांनी जागेवरच उत्तरीय तपासणी केली. दोनच दिवसांत पिशोर पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळाले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद