महिला रेल्वे प्रवाशाला विंचूचा दंश
By Admin | Updated: June 7, 2017 13:54 IST2017-06-07T13:54:17+5:302017-06-07T13:54:17+5:30
सिंकदराबादला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर अजिंठा एक्स्प्रेसची प्रतिक्षा करणा-या एका महिलेला विंचूने दंश केल्याची घटना नगरसोल रेल्वेस्टेशनवर मंगळवारी(दि.६) रात्री घडली.

महिला रेल्वे प्रवाशाला विंचूचा दंश
>ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 06 - सिंकदराबादला जाण्यासाठी प्लॅटफॉर्मवर अजिंठा एक्स्प्रेसची प्रतिक्षा करणा-या एका महिलेला विंचूने दंश केल्याची घटना नगरसोल रेल्वेस्टेशनवर मंगळवारी(दि.६) रात्री घडली. विंचूच्या दंशानंतरही नगरसोल ते लासूर स्टेशनपर्यंत असह्य वेदना सहन करीत प्रवास करण्याची वेळ या महिलेवर आली. लासूर स्टेशन येथे वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर अखेर वेदनेतून सुटका झाली.
एस. हेमावती(२१, रा. सिंकदराबाद) या परिवारातील पाच सदस्यांसह शिर्डी येथे साई दर्शन करून घरी परतण्यासाठी नगरसोल रेल्वेस्टेशनवर ६ जून रोजी रात्री ८ वाजता आल्या होत्या. अजिंठा एक्स्प्रेसमध्ये त्यांचे आरक्षण होते. या ठिकाणी बसण्याची अपु-या व्यवस्थेमुळे उभे राहूनच रेल्वेची प्रतिक्षा करण्याची वेळ त्यांच्यावर आली. बºयाच वेळ उभे रहावे लागल्याने त्या प्लॅटफॉर्मवर बसल्या. याचदरम्यान एका विंचूने एस. हेमावती यांच्या पायाला दंश केला. त्यामुळे त्या जोरात ओरडल्या. तेव्हा आजूबाजूचे प्रवासी त्यांच्याकडे धावले. त्याच वेळी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी आसाराम जुंदरे हे तेथे पोहोचले. तेव्हा त्यांच्या नजरेस विंचू पडला. या रेल्वेस्टेशनवर डॉक्टरची सुविधा होऊ शकत नसल्याने या घटनेची नांदेड नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली.
अशा परिस्थितीत अजिंठा एक्स्प्रेस रेल्वेस्टेशनवर दाखल झाली होती. त्यामुळे एस. हेमावती असह्य वेदना सहन करीत रेल्वेत बसल्या. रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना या घटनेची माहिती प्राप्त झाली. तेव्हा त्यांनी या रेल्वेला लासूर स्टेशनवर काही मिनिटे थांबविण्याची विनंती रेल्वे अधिकाºयांना केली. त्यास अधिकाºयांनी तात्काळ होकार दिला. या ठिकाणी ही रेल्वे दाखल होताच सज्ज असलेले लासूर येथील डॉ. नंदकुमार उदावंत, डॉ. कृष्णा औटे यांनी सदर महिलेवर तात्काळ वैद्यकीय उपचार केले. उपचारामुळे विंचूच्या दंशामुळे होणाºया वेदना कमी झाल्या. मिळालेल्या सहकार्याबद्दल परिवारातील सदस्यांनी सर्वांचे आभार मानले. रात्री साडेदहा वाजता ही रेल्वे सिकंदराबादसाठी रवाना झाली.
वैद्यकीय उपचारासाठी डॉ. नंदकुमार उदावंत, डॉ. कृष्णा औटे यांच्यासह रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी, लासूर स्टेशन व्यवस्थापक भगवानसिंग मीना, सीताराम पोलके, टी. टी.ई. धनराज, संतोष काळे, राजेश चव्हाण, विकी ठोले, बाळू शर्मा,सचिन पांडे आदींनी प्रयत्न केले.