महिला मंडळाच्या वतीने देवी प्रतिमेची मिरवणूक

By Admin | Updated: October 27, 2015 00:22 IST2015-10-27T00:15:35+5:302015-10-27T00:22:39+5:30

भूम : शहरातील कसबा भागातील जिजाऊ महिला मंडळाच्या नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Women's Mandal's Deity Image Promotion | महिला मंडळाच्या वतीने देवी प्रतिमेची मिरवणूक

महिला मंडळाच्या वतीने देवी प्रतिमेची मिरवणूक


भूम : शहरातील कसबा भागातील जिजाऊ महिला मंडळाच्या नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सोमवारी अत्यंत शिस्तबध्द पध्दतीने देवी प्रतिमेची मिरवणूक काढून या उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
या मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सव कालावधीत शहरातील मुकबधीर शाळेत विद्यार्थ्यांना फळे वाटप, मंगळागौर स्पर्धा, भारूड, पाककला स्पर्धा, वेशभूषा, नृत्य, उखाणे, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय महिलांसाठी आरोग्य विषयक शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. याचा अनेक महिलांनी लाभ घेतला.
सोमवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने नवरात्रोत्सवातील या कार्यक्रमांची सांगता करण्यात आली. कसबा व पेठ विभागातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत टाळ, मृदंगासह मुलींच्या झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या नवरात्र महोत्सवासाठी जिजाऊ महिला मंडळाच्या कसबा भागातील सर्व सदस्यांनी तसेच संयोजिका अ‍ॅड. अमृतराव गाढवे यांनी पुढाकार घेतला. (वार्ताहर)

Web Title: Women's Mandal's Deity Image Promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.