पाण्यासाठी महिलांचा हंडामोर्चा

By Admin | Updated: May 29, 2017 00:33 IST2017-05-29T00:30:26+5:302017-05-29T00:33:02+5:30

हिसोडा : भोकरदन तालुक्यातील कोठाकोळी येथील संतप्त महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतवर हंडामोर्चा काढला.

Women's Handicap for Water | पाण्यासाठी महिलांचा हंडामोर्चा

पाण्यासाठी महिलांचा हंडामोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिसोडा : भोकरदन तालुक्यातील कोठाकोळी येथील संतप्त महिलांनी पाण्यासाठी ग्रामपंचायतवर हंडामोर्चा काढला. येथील महिला वीस ते पंचवीस दिवसांपासून पाण्यासाठी दूरवर भटकंती करीत आहेत. याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याने संतप्त महिलांनी रविवारी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडामोर्चा काढला.
या हंडामोर्चात गावातील सुमारे ४० ते ५० महिला सहभागी झाल्या होत्या. गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक तीन विहिरी आहेत. परंतु पाणी पातळी झपाट्याने कमी झाल्याने ग्रामपंचायतने विहिर अधिग्रहण केले आहे. परंतु गावात मुबलक पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतच्या वतीने नियमित ब्लिचिंग पावडर टाकल्या
जात नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला आहे.
त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Web Title: Women's Handicap for Water