महिला लोकशाही दिन होणार जिल्हाधिकारी कार्यालयात

By Admin | Updated: April 16, 2015 00:57 IST2015-04-16T00:45:03+5:302015-04-16T00:57:13+5:30

जालना : शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाने समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा

Women's democracy will be held in the Collector's office | महिला लोकशाही दिन होणार जिल्हाधिकारी कार्यालयात

महिला लोकशाही दिन होणार जिल्हाधिकारी कार्यालयात


जालना : शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागाने समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा, या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाहीदिन पाळण्याचे ठरवले आहे.
त्यानुसार तालुकास्तरावर प्रत्येक तहसील कार्यालयात महिन्याच्या चौथा सोमवार आणि जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याचा तिसरा सोमवार महिला लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येत आहे.
सदर दिनाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी ११ वाजता करण्यात येते.
अर्ज सादर करताना ते वैयक्तिक स्वरूपाचे असावे. तक्रार, निवेदन दोन प्रतीत सादर करावे, सदरील प्रकरणी न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रतीसह सादर करावा.
सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. शासन निर्णयाप्रमाणे प्रथम संबंधित तहसीलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी, तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास संंबंधित महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करू शकतील.
तालुकास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसीलदार व सदस्य सचिव तथा बालविकास प्रकल्प अधिकारी यांना राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करू शकतील.
त्यासाठी तालुकास्तरावर तहसील कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क करून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी के.डब्ल्यू. इंगळे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women's democracy will be held in the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.