शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणापेक्षाही महिलांना हवे राजकीय शिक्षण

By admin | Updated: July 31, 2014 00:43 IST

चेतन धनुरे, लातूर देशाचा समतोल विकास साधण्यासाठी महिलांना राजकीय प्रक्रियेत सामावून घ्यावेच लागेल़

चेतन धनुरे, लातूरदेशाचा समतोल विकास साधण्यासाठी महिलांना राजकीय प्रक्रियेत सामावून घ्यावेच लागेल़ किमान लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना विधानसभा, लोकसभेत संधी मिळाल्यास सर्वच घटकांचा विकास साध्य करता येऊ शकतो़ परंतु, त्यासाठी महिलांना केवळ आरक्षण देऊन भागणार नाही तर त्यांना राजकीय शिक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मत राज्यशास्त्र, लोकप्रशासन विषयाच्या महिला अभ्यासकांनी व्यक्त केले़भारतातील पहिल्या महिला विधिमंडळ सदस्या मद्रास प्रांतातील डॉ़मुथुलक्ष्मी रेड्डी यांची ३० जुलैै रोजी जयंती आहे़ त्यांनी मद्रास विधीमंडळात काम करताना आपले राजकीय कसब पणाला लावून छाप पाडली होती़ राजकारणातही महिला स्वतंत्रपणे आपले अस्तित्व निर्माण करु शकतात, हेच त्यांनी १९२७ ते १९३० या कालावधीत दाखवून दिले़ त्यामुळेच त्यांची विधिमंडळाच्या उपाध्यक्षपदीही निवड करण्यात आली़ विधीमंडळाच्या जगातील पहिल्या महिला उपाध्यक्षाचा मानही रेड्डी यांनाच जातो़ मुलींच्या लग्नाचे किमान वय ठरविण्याबाबतही मुथुलक्ष्मी रेड्डी विधीमंडळात आग्रही होत्या़ महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क मिळावे म्हणून त्यांनी मोठे कार्य केले़ महिलांच्या हक्कासाठी त्यांनी ‘वूमन्स इंडियन असोशिएशन’ स्थापन केले़ या संघटनेच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या़ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदवितानाच त्यांनी वैैद्यकीय, राजकीय, साहित्य क्षेत्रात भरीव काम केले आहे़ लोकसंख्येनुसार संधी हवीमहिलांना राजकीय क्षेत्रात काम करीत असताना मानसिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे़ निर्णयप्रक्रियेत त्यांना सामावून घेताना त्यांच्या मताला किंमत असावी़ तसेच आरक्षणापेक्षाही महिलांना लोकसंख्येच्या प्रमाणात संधी असावी, असे वाटते़ - डॉक़ुसुमताई मोरे, प्राचार्या, जयक्रांती महाविद्यालय, लातूरसंघटन वाढणे आवश्यकमहिलांचा राजकीय सहभाग वाढवायचा असेल तर शिक्षण वाढवले पाहिजे़ आत्मसन्मान वाढविण्यासाठी पुरुषांनी मानसिकता बदलावी़ एक टर्म काम केल्यानंतर बहुतांश महिला लोकप्रतिनिधी पुन्हा दिसत नाहीत़ हे बदलण्यासाठी स्त्री संघटन गरजेचे आहे़ - डॉ़प्रभा वाडकर, निवृत्त राज्यशास्त्र विभागप्रमुखमहिलांमध्ये क्षमता असतानाही त्यांना संधी मिळत नाही, अशी खंत व्यक्त होते़ त्यास लातूरही अपवाद नाही़ जिल्ह्यातून रुपाताई पाटील निलंगेकर या एकमेव महिला खासदाराचा अपवाद सोडला तर एकदाही महिलेस विधानसभा, विधानपरिषद, लोकसभेवर संधी मिळाली नाही़राजकारण ही पाठशाळा़़़राजकारण ही सगळ्याच क्षेत्राची पाठशाळा असते़ त्यामुळे याठिकाणी काम करताना महिलांना सुरक्षितता हवी़ राजकीय आरक्षणातून गुणात्मक वाढ साध्य झाली नाही़ त्यामुळे महिलांना राजकीय शिक्षण मिळणे गरजेचे आहे़ - डॉ़प्रीती पोहेकर, लोकप्रशासन विभागप्रमुख, राजर्षी शाहू महाविद्यालयठळक राजकीय कामगिरीविधिमंडळात काम करीत असताना मुथुलक्ष्मी रेड्डी यांनी ‘देवदासी’ प्रथेविरुद्ध कायदा निर्माण करण्यासाठी आवाज उठविला होता़ जे पुढे यशस्वी झाले़ तसेच ‘मुलींना आठवीपर्यंत मोफत शिक्षण’ ही परिणामकारक योजनाही त्यांनी मद्रास विधीमंडळात मांडली होती़