शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

राज्यात ५१ बसस्थानकांतील प्रसाधनगृहांत महिलांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:34 AM

एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील प्रसाधनगृहांत महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसाधनगृहांत लघुशंकेची सुविधा मोफत असताना ५१ बसस्थानकांत महिलांकडून पैशांची आकारणी केली जात असल्याचे उघडकीस आले.

ठळक मुद्देधक्कादायक : मोफत सुविधा असतानाही पैशांची आकारणी, २२३ ठिकाणी महिला कर्मचारी नाहीत

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील प्रसाधनगृहांत महिलांची आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसाधनगृहांत लघुशंकेची सुविधा मोफत असताना ५१ बसस्थानकांत महिलांकडून पैशांची आकारणी केली जात असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने विभाग नियंत्रकांना बसस्थानकातील प्रसाधनगृहांना भेटी देण्याची सक्त सूचना केली आहे.एसटी महामंडळातर्फे बसस्थानकांतील प्रसाधनगृहांत लघुशंकेसाठी मोफत सुविधा दिली जाते; परंतु बसस्थानकांमध्ये महिलांची अडवणूक करून जबरदस्तीने पैसे आकारले जातात. बस पकडण्याची घाई आणि माहितीचा अभाव, यामुळे पैसे देण्याशिवाय महिला प्रवाशांसमोर पर्याय नसतो. काही प्रवाशांमुळे हा प्रकार अधिकाऱ्यांपर्यंत जातो; परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई होत नाही. याचाच फायदा घेत प्रसाधनगृहचालक महिनोन्महिने पैशांची कमाई करीत आहेत. यासंदर्भात एसटी महामंडळातील वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकाºयांपर्यंत तक्रारी पोहोचल्या होत्या. त्यामुळे सुरक्षा व दक्षता अधिकाºयांनी राज्यभरातील बसस्थानकांतील प्रसाधनगृहांमध्ये अचानक तपासणी केली. तेव्हा प्रसाधनगृहातील अनेक गैरप्रकार उघडे पडले.दक्षता सुरक्षा अधिकाºयांनी केलेल्या तपासणीत राज्यातील कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणीसह राज्यात ५१ ठिकाणच्या प्रसाधानगृहांत महिलांकडून २ रुपयांपेक्षा जास्त रुपयांची आकारणी केली जात असल्याचे आढळून आले. २२३ ठिकाणी महिलांच्या प्रसाधनगृहात महिला कर्मचाºयांची नेमणूकच केलेली नसल्याचाही गंभीर प्रकार समोर आला. या प्रकाराची एसटी महामंडळाने गांभीर्याने नोंद घेत विभाग नियंत्रकांना एका पत्राद्वारे सूचना केल्या आहेत.प्रसाधनगृहाच्या दर्शनी भागात लघुशंकेच्या मोफत सुविधेसह शौचालय, स्नानगृह वापरण्याच्या दरासंदर्भात फलक लावण्यात यावा. महिलांकडून पैसे घेण्यात आल्याची तक्रार सिद्ध झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आाहे. महिला प्रसाधनगृह वापर मोफत असल्याने स्वच्छता राखली जात नसल्याचे समोर आले. त्यामुळे महिला प्रसाधनगृहातील स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, अशी सक्त सूचना करण्यात आली आहे.अहवाल देण्याची सूचना१९४ प्रसाधनगृहांत शौचालय वापरासाठी पुरुषांकडून ३ रुपयांपेक्षा अधिक रुपयांची आकारणी केले जात असल्याचे समोर आले. प्रसाधनगृहासंदर्भात तक्रार आल्यानंतर सात दिवसांत संबंधित कार्यवाही करून पोच देण्यात यावी. विभाग नियंत्रक आणि तपासणी अधिकाºयांनी आगार भेटीत प्रसाधनगृहास भेट द्यावी, तसेच दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करून ३० नोव्हेंबरपर्यंत कार्यपूर्ती अहवाल सादर करण्याची सूचना महाव्यवस्थापकांनी केली आहे.

टॅग्स :Womenमहिलाstate transportएसटी