स्कूल बसच्या धडकेत महिला ठार

By Admin | Updated: December 24, 2015 00:02 IST2015-12-23T23:49:20+5:302015-12-24T00:02:02+5:30

औरंगाबाद : भरधाव स्कूल बसच्या धडकेत पादचारी महिला जागीच ठार झाली. हा भीषण अपघात बुधवारी दुपारी अंजली सिनेमागृहाजवळ घडला.

Women killed in school bus crash | स्कूल बसच्या धडकेत महिला ठार

स्कूल बसच्या धडकेत महिला ठार

औरंगाबाद : भरधाव स्कूल बसच्या धडकेत पादचारी महिला जागीच ठार झाली. हा भीषण अपघात बुधवारी दुपारी खडकेश्वर परिसरातील अंजली सिनेमागृहाजवळ घडला.
शांताबाई अंबादास वाहूळ (५०, रा. इंदिरानगर, गारखेडा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, भोईवाडा येथे महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय आहे. शांताबाई बुधवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास औरंगपुऱ्याकडून या कार्यालयाकडे पायी जात होत्या. अंजली सिनेमागृहासमोर मागून भरधाव आलेल्या एका शाळेच्या बसने त्यांना जोराची धडक दिली. शांताबाई यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना उस्मानपुरा परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना दुपारी १.५० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश धोकरट यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणी बसचालकास ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रियान इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी बस जात असताना हा अपघात घडला. अपघात पाहून बसमधील विद्यार्थी भयभीत झाले. बसमधील केअर टेकर्संनी त्यांची समजूत काढली. पोलिसांनी मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देऊन बस पोलीस ठाण्यासमोर उभी केली.

Web Title: Women killed in school bus crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.