महिलांनीच रचले सरण अन् दिला अग्निडाग

By Admin | Updated: December 29, 2014 00:58 IST2014-12-29T00:38:50+5:302014-12-29T00:58:04+5:30

व्यंकटेश वैष्णव , बीड सरणावर जाताना मला इतकेच कळले होते जगण्याने केली सुटका मरणाने छळले होते

Women created the arrows and gave it to Agnidag | महिलांनीच रचले सरण अन् दिला अग्निडाग

महिलांनीच रचले सरण अन् दिला अग्निडाग


व्यंकटेश वैष्णव , बीड
सरणावर जाताना
मला इतकेच कळले होते
जगण्याने केली सुटका
मरणाने छळले होते
या सुरेश भटांच्या ओळीला अक्षरश: माणसानेच तडा दिला. परळीत स्रेहनगर भागात रहाणाऱ्या सुनीता (वय-४५ नाव बदलले आहे) या देहविक्रेय करणाऱ्या महिलेला जगण्याने तर छळलेच, परंतु मृत्यूनंतर सुध्दा तिच्या विटाळलेल्या शरीराला हात लावण्यास नातेवाईकांनी नकार दिला. मात्र मुक्तांगणच्या आशा मडके व इतर महिलांनी पुढे येऊन तिला खांदा दिला. एवढेच काय महिलांनीच सरणही रचले अन् शनिवारी अग्नीडागही दिला.
एकेकाळी देहविक्रेय करणाऱ्या व चंगळवादी समाजाचा बळी ठरलेल्या सुनीताला जिवंतपणी नरक यातना सोसाव्या लागल्या. मात्र मरणा नंतर देखील तिची हेळसांड थांबली नाही.
शुगरच्या आजारामुळे मागील सहा महिन्यांपासून आजारी असलेल्या सुनीताचा मुत्यू शनिवारी झाला. सुनीताला एक तीस वर्षांचा मुलगा आहे. मात्र तो आईला (सुनीताला) सांभाळत नसल्यामुळे सुनीताचे आयुष्य एकाकी झाले होते. देहविक्रेयाच्या व्यवसायातून बाहेर पडू पहाणारी सुनीता २०१२ दरम्यान मुक्तांगण संस्थेच्या सहवासात आली. येथे तिला मुक्तांगणच्या आशा मडके यांनी तिचे पूनर्वसन केले. तिला वेश्या व्यवसायातून बाहेर काढले होते. इतरांप्रमाणे आपणही जीवन जगावे या तिच्या इच्छेमुळे सुनाताने देहविक्रेय करण्याचा व्यवसाय सोडून देवून मिळेल तिथे काम करण्याचे सुरू केले. या दरम्यानच सुनीताला शुगरच्या आजाराने घेरले. मागील दोन महिन्यांपासून ती शासकीय रूग्णालयात उपचार घेत होती. मात्र गुण आला नाही. यात तिचा मुत्यू झाला. मुत्यूनंतर तिच्या काही नातेवाईकांनी तिचा अंत्यविधी करण्यास नकार दिला.
अशा बिकट परिस्थितीत मुक्तांगणच्या आशा मडके यांनी पुढाकार घेतला. मुक्तांगण अंतर्गत काम करणाऱ्या कमल जोगदंड, अर्चना कळसे, मीरा लहाने, शांताबाई कांबळे, अनुसया सावंत या महिलांनी एकत्र येऊन सुनीताला स्मशानभूमीत आणले. स्मशानभूमीत सरण रचण्याचे काम देखील महिलांनीच केले. याप्रसंगी मुलगा प्रचंड दारू पिलेला असल्याने त्याला आपल्या आईला (सुनीताला) अग्नीडाग देणे शक्य नसल्याने मुक्तांगणच्या आशा मडके यांनीच अग्नीडाग दिला असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
तिच्या अंत्यविधीला ना तिचे कोणी नातेवाईक आले, ना आसपास राहणारे लोक. दुसऱ्याच्या शरीराची भूक भागविण्यासाठी स्वत:च्या शरीराकडे लक्ष न दिलेल्या सुनीताला मरणानंतरही हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. ४
देहविक्रेय करण्याच्या व्यवसायातून बाहेर पडल्या नंतर मुक्तांगणच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे निराधार योजने अंतर्गत मानधनासाठी अर्ज केला होता. मानधन मिळविण्यासाठी सुनीताने एक वर्ष प्रशासनाकडे हेलपाटे मारले. गेल्या महिन्यात सुनीताला निराधाराची पगार मंजूर झाली. मात्र आता त्या पैशाचा लाभ घेण्यासाठी तीच या जगात उरली नाही. असे आशा मडके यांनी सांगितले.

Web Title: Women created the arrows and gave it to Agnidag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.