शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: August 27, 2015 00:08 IST2015-08-27T00:08:39+5:302015-08-27T00:08:39+5:30

लातूर/चापोली : चाकूर तालुक्यातील चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा बुधवारी प

Woman's death during surgery | शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू

शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू


लातूर/चापोली : चाकूर तालुक्यातील चापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेचा बुधवारी पहाटे ३ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी लातूरच्या सर्वोपचार रुग्णालयात दोषी डॉक्टरांवरील कारवाईसाठी ठिय्या मांडला.
चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी माहेर असलेल्या शितल अरुण हुले (वय २४, रा़तिपराळ, ता़शिरुर अनंतपाळ) यांना मंगळवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित शिबिरात बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. यादरम्यान मंगळवारी त्यांच्यावर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिनटाक्याची शस्त्रक्रिया केली, मात्र नंतर त्या शुद्धीवरच आल्या नाहीत़ त्यामुळे त्यांना लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात रेफर केले़ सर्वोपचारमध्येही शस्त्रक्रिया केली़ परंतू उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली़ यानंतर संतप्त नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला़ बुधवारी रात्रीपर्यंत हा तिढा सुटला नव्हता़ (प्रतिनिधी)

Web Title: Woman's death during surgery