दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:34 IST2019-07-04T20:34:22+5:302019-07-04T20:34:31+5:30
कंपनीत कामाला जाताना दुचाकीवरुन पडल्याने जखमी झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

दुचाकीवरुन पडल्याने महिलेचा मृृत्यू
वाळूज महानगर : कंपनीत कामाला जाताना दुचाकीवरुन पडल्याने जखमी झालेल्या ३७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रांजणगाव येथे घडली. कविता देवानंद थोरात (३७, रा. दत्तनगर, रांजणगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
कविता थोरात या मुलगा तुषारसोबत गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरुन दुचाकीने (एमएच-२०, एफई- ८१८७) वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत कामाला जात होत्या. दरम्यान, क्लिंटन वॉईन शॉपसमोर अचानक डुक्कर अडवे आले. त्यामुळे तुषारने तात्काळ दुचाकीचे ब्रेक मारले. त्यामुळे दुचाकीवरुन दोघे माय-लेक खाली पडले.
यात कविता यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्या बेशुद्ध पडल्या. कविता यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासून डॉक्टरांनी कविता यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.