जिममध्ये व्यायाम करताना महिलेचे लपून काढलेले फोटो व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजसह पाठवले
By बापू सोळुंके | Updated: April 22, 2023 20:17 IST2023-04-22T20:16:30+5:302023-04-22T20:17:22+5:30
तक्रारदार महिला शहरातील एका व्यायामशाळेत नियमित व्यायाम करण्यासाठी जाते

जिममध्ये व्यायाम करताना महिलेचे लपून काढलेले फोटो व्हॉट्सअपवर अश्लील मेसेजसह पाठवले
छत्रपती संभाजीनगर : व्यायामशाळेत व्यायाम करणाऱ्या महिलेस तिचे छायाचित्र आणि अश्लील मेसेज व्हॉट्सअपवर पाठवून विनयभंग केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अनोळखी मोबाईलधारकाविरोधात गुन्हा नोंदविला. ही घटना १२ एप्रिल रोजी सातारा परिसरात घडली.
तक्रारदार महिला शहरातील एका व्यायामशाळेत नियमित व्यायाम करण्यासाठी जात असते. १२ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ती घरी असताना तिच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईलधारकाने व्हॉट्सअपवर काही मेसेज केले. ते मेसेज पाहिले असता त्यांचे व्यायाम करतानाचे छायाचित्र पाठविले. या सोबतच त्याने काही घाणरेेडे मेसेज पाठविले.
या प्रकारानंतर संतप्त महिलेने थेट सातारा पोलीस ठाणे गाठून तक्रार नाेंदविली. पोलिसांनी विनयभंग आणि आय.टी. ॲक्ट नुसार गुन्हा नोंद केला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.