शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वूमन पॉवर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० हजार महिलांची उद्योगांत आघाडी

By विजय सरवदे | Updated: August 4, 2023 17:52 IST

२०१ गावांतील बचतगटांना महिला आर्थिक विकास महामंडळाचे बूस्टर

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील तब्बल २०१ गावांतील महिलांच्या बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळाने प्रोत्साहन देत त्यांच्यात उद्योग व्यवसायाची ‘उमेद’ जागवली. परिणामी या गटांतील महिलांनी समूह तसेच वैयक्तिक स्वरूपाच्या सुरू केलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. यामुळे त्यांचे कुटुंबच नव्हे, तर गावांच्या प्रगतीलादेखील मोठा हातभार लागला आहे, हे विशेष! 

महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) जिल्ह्यात १ हजार ९७५ महिला बचतगटांचे जाळे विणले आहे. या माध्यमातून २० हजार ३५७ महिला एकत्र आल्या असून त्यांनी विविध व्यवसाय सुरू केले आहेत. बचत गटांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी ‘माविम’ने काही बँकांसोबत करार केला आहे. ‘माविम’च्या शिफारसीनुसार बँकांकडून सामूहिक स्तरावर उद्योग करण्यासाठी जिल्ह्यातील ७४४ गटांना २७ कोटी १३ लाख रुपयांचे सामूहिक कर्ज, तर ८४ महिलांना वैयक्तिक स्वरूपाचे प्रत्येकी १ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध झाले आहे. एवढेच नाही, तर बचत गटांतील महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांना उद्योग- व्यवसायासाठी प्रेरित करणे, बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम या कार्यालयामार्फत केले जात असल्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

समूह स्तरावरील उद्योग कोणतेबचत गटांना समूह स्तरावर १ ते १७ लाखांपर्यंत कर्ज मिळते. या माध्यमातून महिलांनी समूह शेती, भाडेतत्त्वावर शेती, धान्य खरेदी-विक्री, भाजीपाला खरेदी-विक्री, कापडी पिशव्या बनविणे, दालमिल, मिरची पावडर, हळद पावडर, विविध मसाले, पापड तयार करणे, हॅण्डीक्राफ्ट वस्तू, दूध संकलन आणि प्रक्रिया आदी समूह स्तरावर उद्योग सुरू केले आहेत.

वैयक्तिक उद्योग कोणतेबँकांकडून १ लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य मिळाल्यामुळे महिलांनी वैयक्तिक स्तरावर शिवणकाम, ब्युटीपार्लर, भोजनालय, स्टेशनरी, कटलरी, किराणा दुकान अशाप्रकारचे व्यवसाय सुरू केले आहेत.

उत्पादित मालाला मागणीमहिलांना उद्योग, व्यवसायासाठी प्रेरित करण्यात आल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास २०१ गावांतील महिला बचत गट सुरू झाले. अनेक बँक कर्जातून अनेक महिलांचे व्यवसाय सुरू झाले. उत्पादित मालाला शहर आणि ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. त्यामुळे महिलांची सामाजिक तसेच आर्थिक उन्नती झाली आहे.- शीला सुर्वे-जवंजाळ, जिल्हा समन्वय अर्धकारी, (माविम)

लोकसंचलित साधन केंद्रांमार्फत बचत गटतालुका- सीएमआरएसी- बचत गट- महिलाऔरंगाबाद (शेंद्रा)- रमाई- ३००- ३१५२गंगापूर- तेजस्विनी- ३५०- ३६०२गंगापूर- सावित्रीबाई फुले- ३२१- ३३२०गंगापूर- प्रगती- ३२५- ३३३९पैठण- एकता- २२५- २२५०सिल्लोड- प्रेरणा- २८०- २८६७फुलंब्री- आम्रपाली- १७४- १८२७

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादbusinessव्यवसायWomenमहिला