‘त्या’ महिलेने आत्महत्या केल्याचे निष्पन्न; शॉक लागून किंवा गिझरच्या स्पार्किंगने मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 15:25 IST2018-06-23T15:23:17+5:302018-06-23T15:25:23+5:30
सिडको एन-६ येथील आविष्कार कॉलनीत स्नानगृहात मृतावस्थेत आढळलेल्या पुष्पलता दत्तात्रय दहिवाळ यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पोलीस तपासात समोर आले आहे.

‘त्या’ महिलेने आत्महत्या केल्याचे निष्पन्न; शॉक लागून किंवा गिझरच्या स्पार्किंगने मृत्यू नाही
औरंगाबाद : सिडको एन-६ येथील आविष्कार कॉलनीत स्नानगृहात मृतावस्थेत आढळलेल्या पुष्पलता दत्तात्रय दहिवाळ यांनी जाळून घेऊन आत्महत्या केल्याचे शुक्रवारी पोलीस तपासात समोर आले आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी त्यांचा शवविच्छेदनापूर्वी (इनक्वेस्ट) इन कॅमेरा पंचनामा केला, तेव्हा त्यांच्याजवळ अर्धवट जळालेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्याचे सिडको पोलिसांकडून समजले.
सिडको पोलिसांनी सांगितले की, पुष्पलता दहिवाळ यांचा बुधवारी सकाळी सव्वासहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास स्नानगृहात शॉक लागून आणि इलेक्ट्रिक गिझरच्या स्पार्किंगमुळे होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मृताच्या निकटवर्तीयांनी दिली होती. दरम्यान हा अपघात नसून पुष्पलता यांनी स्नानगृहात जाळून घेऊन आत्महत्या के ल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले. पोलिसांनी घाटी रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केले. तत्पूर्वी त्यांचा इन कॅमेरा पंचनामा केला. त्यावेळी त्यांच्या अंगावरील कपड्यात त्यांनी लपवून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली.
ही चिठ्ठी अर्धवट जळालेली असल्याने त्यातील मजकुराचा अर्थ स्पष्ट होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रॉकेल ओतून घेऊन त्यांनी जाळून घेतल्याने हा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पुष्पलता यांचे पती श्री. श्री. महामंडलेश्वर दत्तात्रय महाराज दहिवाळ, त्यांचा मुलगा आणि सून यांचा जबाब पोलीस घेणार आहेत.
इलेक्ट्रिकल विभागाचा अहवाल मागविला
या घटनास्थळी शॉर्टसर्किट अथवा गिझरचे स्पार्किंग झाले होते का याबाबतचा अहवाल इलेक्ट्रिकल विभागाकडून मागविण्यात आला असल्याची माहिती निर्मला परेदशी यांनी दिली.