शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

महिलेकडून न्यूड व्हिडिओ कॉल करून वृद्धाची ब्लॅकमेलिंग, १४ लाख उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:19 IST

पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : निर्वस्त्र अवस्थेतील महिलेने एका वृद्धाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल केला. त्यादरम्यान स्क्रीनशॉट्स काढत व्हिडिओही रेकॉर्ड केला. त्यानंतर तिच्यासह सायबर गुन्हेगारांच्या टोळीने ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अवघ्या १२ तासांत वृद्धाकडून तब्बल १४ लाख ६६ हजार ७७३ रुपये उकळले. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

गारखेडा परिसरात राहणारे ६० वर्षीय वृद्ध हे एका नामांकित कंपनीतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. २३ मार्च रोजी सकाळी त्यांना व्हॉट्सॲपवर एक व्हिडिओ कॉल आला. कॉल उचलताच समोर एक निर्वस्त्र महिला होती. महिलेने कॉलदरम्यान व्हिडिओ रेकॉर्ड आणि स्क्रीनशॉट्स घेतले. काही वेळातच स्वत:ला पोलिस अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यांचे कॉल येऊ लागले. ‘तुमचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात येणार आहे, तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे’, असे धमकावत पैशांची मागणी सुरू केली. घाबरलेल्या वृद्धाने प्रकरण मिटवण्यासाठी पैसे द्यायला सुरुवात केली.

२१ हजार ते १४ लाखांपर्यंत लूटसायबर गुन्हेगारांनी प्रथम २१ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर एकामागून एक मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, अरविंद सिंग, केहर नाथ, काजल सिंग नावाने कॉल करत एकूण १४ लाख ६६ हजार ७७३ रुपये उकळले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे तपास करत आहेत.

काय आहे हा स्कॅम ?अचानक अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल येतो. यावर महिला, तरुणी विवस्त्र असतात किंवा कॉलवर पॉर्न व्हिडिओ लावले जातात. त्यात तुमचा चेहरा दिसेल याची काळजी घेऊन स्क्रीनशॉट्स व व्हिडिओ रेकॉर्ड केले जातात. नंतर स्वत:ला पोलिस, सायबर अधिकारी म्हणवून धमक्या देऊन पैसे उकळले जातात.

ही काळजी घ्या-अनोळखी क्रमांकावरून आलेले व्हिडिओ कॉल उचलू नका.-सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती, फोटो उघडपणे शेअर करू नका. सर्व प्रोफाईल लॉक, प्रायव्हेट ठेवा.-असे प्रकार घडलेच तर घाबरून पैसे देऊ नका. तत्काळ सायबर पाेलिसांकडे तक्रार करा.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरhoneytrapहनीट्रॅप