तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांविना
By Admin | Updated: June 8, 2014 00:33 IST2014-06-08T00:26:02+5:302014-06-08T00:33:53+5:30
सेनगाव : येथील तहसील कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी निवडणूक प्रशिक्षणाच्या नावाखाली संपूर्ण कार्यालयच ओस पडल्याचे चित्र होते.
तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांविना
सेनगाव : येथील तहसील कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी निवडणूक प्रशिक्षणाच्या नावाखाली संपूर्ण कार्यालयच ओस पडल्याचे चित्र होते. तसेच अनेक कक्षांना दिवसभर कुलूप होते.
येथील तहसील कार्यालयातील कारभार मागील काही दिवसांपासून ढेपाळला आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारांसह जवळपास सर्वच अव्वल कारकून, कनिष्ठ लिपीक हिंगोली येथून अपडाऊन करीत तहसील कार्यालयाचा कारभार पाहत आहेत. बहुतांश अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेचे नियम पाळत नसून ‘कार्यालयात उशिरा येणे व लवकर जाणे’ हा नवा पायंडा तहसील कार्यालयात लागू झाला आहे. बैठका, दौऱ्यांच्या नावाखालीही अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत आहेत. यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबत असून, या कारभारावर कुणाचाही अंकुश उरला नाही. शुक्रवारी दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयाला भेट दिली असता तहसील कार्यालय नावापुरतेच चालू होते. तहसीलदारांसह तिन्ही नायब तहसीलदारांचे कक्ष कुलूपबंद होते. पुरवठा विभाग, आवक- जावक कक्षही बंद होते. कार्यालयात केवळ सेतू सुविधा केंद्र चालू होते.
यासंबंधी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सर्व अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणाला गेले असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार तहसील कार्यालयात नित्याचाच झाला असून, अपुरे कर्मचारी आणि त्यात अप-डाऊन, दांडीबहाद्दरांमुळे कारभार ढेपाळला आहे. (वार्ताहर)
सेनगाव येथील तहसील कार्यालयात जबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचारी गैरहजर राहण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून वाढले
तहसीलदार, नायब तहसीलदारांसह बहुतांश अव्वल कारकून, कनिष्ठ लिपिक हिंगोली येथून अपडाऊन करीत तहसील कार्यालयाचा कारभार पाहतात.
बहुतांश अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेचे नियम पाळत नसून ‘कार्यालयात उशिरा येणे व लवकर जाणे’ हा नवा पायंडा तहसील कार्यालयात पडू लागला आहे.
बैठका, दौऱ्यांच्या नावाखालीही अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहत आहेत. यामुळे सर्वसामान्यांची कामे खोळंबत असून, या कारभारावर कुणाचाही अंकुश नसल्याची स्थिती आहे.
निवडणूक प्रशिक्षणाच्या नावाखाली शुक्रवारी बहुतांश कर्मचारी गायब झाले होते
सेतू सुविधा केेंद्र वगळता अनेक विभागातील कामकाज बंद असल्याचा प्रकार शुक्रवारी पहावयास मिळाला