शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

युतीशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे अशक्यच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 05:57 IST

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देरामदास आठवले यांची भूमिका : सेना-भाजपमध्ये समेट घडविण्यासाठी पुढाकार; पंतप्रधानांना हस्तक्षेप करण्याची सूचना करणार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेने एकत्र यावे. एकटे लढल्यास महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे शक्य नाही. भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढली तरच सेनेचा मुख्यमंत्री शक्य आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे व्यक्त केले.रिपाइंच्या मराठवाडास्तरीय बैठकीस उपस्थित राहण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, युतीच्या सत्ता सूत्रानुसार ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल किंवा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री असावा, अशी तडजोड होऊ शकेल. यासाठी शिवसेनेने बीजेपी सोबत राहिले पाहिजे. महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपसोबत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सेना-भाजप यासंदर्भात आणखी एकदा पंतप्रधानांना आठवण करून देणार आहे. केंद्रात कॅबिनेट आणि महाराष्ट्रातही एखादे मंत्रीपद देऊन सेनेची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न व्हावा, असाही आपला प्रयत्न राहणार आहे. शिवसेना जर भाजपसोबत राहिली नाही, तर त्यामध्ये सेनेचेच नुकसान होईल. लोकसभा निवडणुकीत रिपाइंला किमान २ जागा मिळाव्यात, विधानसभेत सेना-भाजपची युती झाली, तर रिपाइंला१४-१५ जागा, युती झाली नाही तर किमान २५-३० जागा दिल्या पाहिजे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसंदर्भात आॅर्डिनन्स काढण्यासाठी आमचे केंद्रीय समाजकल्याण मंत्रालय विचार करीत आहे. येणाऱ्या अधिवेशनामध्ये १८ जुलै ते १० आॅगस्ट या काळात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टला संरक्षण देणारा आॅर्डिनन्स जारी करण्याचा विचार आहे. मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये मिळणाºया आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी कायदा करावा, अशी एससी, एसटी अधिकारी फोरमची मागणी आहे. नाणारच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, विकास हवा असेल, तर नाणार प्रकल्प झालाच पाहिजे; पण विस्थापितांचे नुकसान होता कामा नये. तेथील विस्थापित लोकांच्या पुनर्वसनासाठी बजेटमध्ये तरतूद व्हावी.रिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपदमहाराष्ट्राच्या सत्तेत रिपाइंला वाटा मिळाला पाहिजे. महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी उशीर झाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा. तसेच आरपीआयला एक एमएलसी व एक मंत्रीपद मिळावे. राहिलेल्या एक- दीड वर्षासाठी का होईना आरपीआयला संधी मिळाली पाहिजे, यासाठी एक- दोन दिवसांतच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, असे आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबादShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री