शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

कचरा निविदेतून ‘अमृत’ची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:38 IST

शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन ऐनवेळी माघार घेणाºया ठाण्याच्या अमृत इंटरप्राईजेस या कंत्राटदाराची ५० लाखांची इसारा रक्कम जप्त करण्याची तसेच सदर कंत्राटदारास तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरातील कचरा उचलण्याच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन ऐनवेळी माघार घेणाºया ठाण्याच्या अमृत इंटरप्राईजेस या कंत्राटदाराची ५० लाखांची इसारा रक्कम जप्त करण्याची तसेच सदर कंत्राटदारास तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.मार्चअखेर ए टू झेडने शहरातील कचरा उचलण्याचे काम सोडल्यानंतर महापालिकेने स्वत:च्या यंत्रणेमार्फत कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहेत. त्याचवेळी निविदा प्रक्रियाही झाली. शहरातील कचरा उलचण्यासाठी तीन कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या.यातील सर्वात कमी दर ठाण्याच्या अमृत इंटरप्राईजेसने टाकले होते. त्यामुळे महापालिकेने ‘अमृत’ला वाटाघाटासाठी बोलावले. कचरा उचलण्यासाठी या कंत्राटदाराने १३७३ रुपयांचा दर टाकला होता. वाटाघाटीनंतर पुढील निर्णय कळवण्यासाठी अमृतने मनपा प्रशासनाकडे पाच दिवसांचा वेळ मागितला. अखेर पाच दिवसानंतर अमृतने आपले एक पत्र महापालिकेला पाठवले असून कचरा उचलण्यासाठीचा दर व्यवस्थापकाने अनवधानाने कमी टाकल्याचे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. असे सांगताना काम करण्यास असमर्थताही दर्शविली आहे.मात्र या सर्व प्रकारामुळे महापालिका प्रशासन संतप्त झाले असून अमृतची ५० लाखांची इसारा रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्याचवेळी अमृत इंटरप्राईजेसला नांदेड महापालिकेच्या कोणत्याही कामाची निविदा तीन वर्षे आता घेता येणार नाही. त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, या निविदा प्रक्रियेत दुसºया क्रमांकाचे दर असलेल्या जी. गोपाल रेड्डी या बंगळुरुच्या कंत्राटदारास मनपाने पत्र दिले़ सदर कंत्राटदाराने कचरा उचलण्यासाठी १९९६ रुपये प्रति मे. टन दर टाकला आहे. त्यांना आता महापालिकेने पाचारण केले आहे. निविदा प्रक्रियेत पहिल्या निविदाधारकाने काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे दुसºया क्रमांकावरील निविदा- धारकाला पाचारण केले़ त्यामध्ये पहिल्या क्रमांकाच्या निविदाधारकाने नमूद केलेल्या दरात काम करणे आवश्यक ठरते. महापालिकेच्या या पत्रास बंगळुरुच्या जी. गोपाल रेड्डी यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पहावे लागणार आहे.