शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

वादळी वाऱ्यासह ‘अवकाळी’च्या सरी

By admin | Published: April 04, 2016 12:26 AM

उस्मानाबाद : दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान तामलवाडी, अचलेर, परडं्यासह लोहाऱ्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला.

उस्मानाबाद : दिवसभर कडाक्याच्या उन्हानंतर दुपारी चार ते साडेचार वाजेदरम्यान तामलवाडी, अचलेर, परडं्यासह लोहाऱ्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणच्या शाळांवरील पत्रे उडाले असून विद्युत ताराही तुटल्या. तर बेंडकाळ येथे वीज पडून म्हैस दगावली.सकाळी नऊ वाजल्यापासूनच घराच्या बाहेर पडणे कठीण होत आहे. दुपाच्या सुमारास तर मुख्य रस्त्यांवरही शुकशुकाट पहावयास मिळतो. रविवारी सकाळपासून उन्हाचे चटके जाणवत होते. मात्र, दुपारी दोन वाजल्यानंतर ढगाळ वातावरण निर्माण होवून वातावरणातील उकाडा कमी झाला. त्यानंतर चार वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील शकुंतला जगन्नाथ गोरे यांच्या शेतातील झाडावर वीज पडली. या घटनेत झाडाखाली बांधलेली म्हैस जागीच ठार झाली. त्याचप्रमाणे अचलेर परिसरातही जवळपास अर्धातास पावसाच्या सरी बरसल्या. वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद शाळेवरील तसेच कुंभार वस्तीतील काही जणांच्या घरावरील पत्रे उडाले. त्याचप्रमाणे अचेलर शिवारातील विद्युत वाहक ताराही तुटल्या. त्यामुळे विद्युतपुरवठा खंडित झाला. दरम्यान, बोरगाव, सलगरा, आलूर येथेही पावसाच्या सरी कोसळल्या. नळदुर्ग परिसरातही साधारणपणे साडेचार वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तुळजापूर शहरासह अणदूर परिसरातही पाऊस झाला. येणेगूर येथेही रिमझीम पाऊस पडला. परंडा शहरातही सहा वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह हलका तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पावसादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील डीपीचा मोठा आवाज झाला. त्यामुळे कोर्ट परिसरासह समतानगर, आदर्श नगर, शिक्षक सोसायटी, समर्थ नगर, राजापुरा गल्ली, मंडई पेठ पसिरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झालेला नव्हता. तहसील कार्यालयातील आपत्कालीन विभागशी संपर्क साधला असता कोणीही उपलब्ध होवू शकले नाही. दरम्यान, वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता रोकडे यांच्याशी संपर्क साधला असता पावसामुळे डीपी नादुरूस्त झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर तो दुरूस्त केला जाईल, असे सांगितले.