शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वारे, ढगांच्या गडगडाटासह बरसला मृग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:12 IST

मान्सूनपूर्व पावसाने शहर चिंब : वादळी वाऱ्याने अनेक भागांतील ‘बत्ती गुल’

औरंगाबाद : मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ताशी १८ किमी वेगाने वाहणारे वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटांसह शहरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. काही भागांत हलक्या सरी, तर काही भागांत मध्यम स्वरुपात बरसलेल्या पावासाने शहर चिंब झाले. पावसाच्या हजेरीने वातावरण आल्हाददायक झाले. चिकलठाणा वेधशाळेत १.४ मिमी तर एमजीएम वेधशाळेत ६.० मिमी पावसाची नोंद झाली.

शहरात सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास आकाशात मोठ्या प्रमाणात ढग दाटून आले. काही वेळातच जोरदार वारे वाहण्यास सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता पावसाला सुरुवात झाली. पावसाला सुरुवात होताच पादचारी, दुचाकीचालकांची तारांबळ उडाली. लहान मुलांनी पहिल्या मोठ्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. काही भागांत रिमझिम तर काही भागांत जोरदार पाऊस पडला. काही मिनिटांच्या पावसाने रस्त्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली. सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत अधूनमधून पडत होता.

या भागांत वीजपुरवठा खंडितसायंकाळी ५.३० वाजता वादळी वारा सुरू होताच अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. गजानन महाराज मंदिर परिसर, जवाहर काॅलनी, गणेश काॅलनी, हर्सूल, माळीवाडा, निशांत पार्क, रेल्वे स्टेशन परिसर, जय भवानीनगर, सातारा परिसर, जाधववाडी, बायजीपुरा, चिकलठाणा, दिल्ली गेट परिसर, छावणी, समाधान काॅलनी, पडेगाव, सेव्हन हिल परिसर, सुराणानगर, सुधाकरनगर, नक्षत्रवाडी, देवळाई चौक, उत्तरानगरी, एन-४, एन-५ दूध डेअरी, पन्नालालनगर, सुहास काॅलनी, मयूरनगर, कटकट गेट परिसर इ. भागांतील वीज ‘गुल’ झाली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धाव घेतली.

मान्सूनपूर्व पावसाच्या सरीगेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाला गुरुवारी सायंकाळनंतर सुरुवात झाली. हलक्या ते मध्यम पावसाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागली. रात्री ८ वाजेपर्यंत एमजीएम वेधशाळेत ६.० मि.मी. पावसाची नोंद झाली. पुढील काही दिवस साधारण दररोज मान्सूनपूर्व पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे.- श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ

टॅग्स :RainपाऊसAurangabadऔरंगाबाद